पल्लवी पटवर्धन
आयुष्यात तू नाहीस तर सगळं जीवनच व्यर्थ आहे..
मैत्री या दोन शब्दांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की त्यात प्रेम आपुलकी त्याग, समर्पण याचं सर्वार्थानं मिश्रण असतं… मैत्रीत जग अति गहिरं, व्यापक आणि अफाट असतं… यात प्रेमळ बोलणं रुसवे-फुगवे ,भांडण , समजुतदारपणा सगळ्या स्वभावाच्या बाजू दडलेल्या असतात .. एकमेकांना समजून घेण्यातच मैत्रीचे बंध घट्ट आणि गडद होतात.
तु अनंत सुखद विचारांची पेरणी करत एक सुरेख देवाण घेवाण असते मैत्रीत…
त्यात अनेक क्षण ओलावलेले असतात जे फक्त मैत्रीचे असतात ..
त्यात एक आर्त जाणीव असते एकमेकांना दिलेल्या विसाव्याच्या घरकुलाची ..
खरंतर मैत्री कुणाचीही कोणाशीही होऊ शकते इथे वयाचं बिलकुलच बंधन नसतं
यांत एक मायेचा हक्क बजावण्याचा महापुरच असतो तुझ्याशिवाय मी अपुर्ण वगैरे वगैरे..
मग एकमेकांच्या मनातल्या गोड क्षणांची आजन्म अशी गुंतवणुक मैत्रीतच असते ..
तिच एक कायमस्वरुपी मिळणारी प्रेमाची अनुभूती असते..
त्यात एक आत्मविश्वास असतो आपल्या अंतरात मोहरणारा..खरंतर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मैत्र बदलत जाते…
सध्या सोशल मीडियामुळे आभासी जगात मैत्री जपणे टिकवणे आणि वाढवणे हे एका अर्थाने सोपं झालेलं आहे… पण ते कृत्रिम संवादयुक्त मैत्र आहे ..असो मैत्रीच्या कल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात..
त्यात एक स्वर असतो एकमेकांना आनंद आणि उत्साह देण्याचा…
त्यात एक अविरत भावना दडलेली असते दिवसरात्र साथ देणारी…
त्यामुळेच एक सुखद हास्य कायम फुलत असतं आपल्या चेह-यावर..
मैत्री हा दोन अक्षरी शब्द असतो पण त्याच्यापुढे अनेक शब्द तोटके असतात..
त्यात अनेक ओलसर भावना जिवंत असतात एक प्रकारचा महापुरच..
तो निखळ प्रवाह असतो ह्रदयातला विलक्षण…
आयुष्यात मैत्रीच्या नात्यांची जागा खूप खास असते… जगात मैत्रीचं नातं हे सर्वश्रेष्ठ आणि खास मानले जातं
फ्रेंडशिप डेची सुरुवात पहिल्या महायुद्धानंतर झाली… अनेक देशांमध्ये द्वेष, शत्रुत्व आणि असंतोषाची भावना निर्माण झाली.. ही भावना संपुष्टात आणण्यासाठी अमेरिकन सरकारने १९३५ झाली फ्रेंडशिप डे ची सुरुवात केली… तेव्हा फ्रेंडशिप डे हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जाईल असे ठरवण्यात आले…याचे मुख्य कारण म्हणजे बहुतांश लोकांना रविवारी सुट्टी असते आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन फ्रेंडशिप डे साजरा करावा हे त्याच्या मागचा मुख्य हेतु आहे…
मैत्री तिच्या नावाप्रमाणेच अशीच प्रेम बरसवत असते कायम आपल्याला हसवत आणि ऊर्जा देत …
मैत्री दिनाच्या अगणित शुभेच्छा…

मस्तच छान 👌👌