ऑगस्ट मधील पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्याची प्रथा आता सुरु झाली आहे.तसं तर अमेरिकन सरकारने १९३५ झाली फ्रेंडशिप डे ची सुरुवात केली… तेव्हा फ्रेंडशिप डे हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जाईल असे ठरवण्यात आले…याचे मुख्य कारण म्हणजे बहुतांश लोकांना रविवारी सुट्टी असते आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन फ्रेंडशिप डे साजरा करावा हे त्याच्या मागचा मुख्य हेतु आहे…सोशल मीडियाच्या माध्यमातून आज असंख्य संदेश प्रत्येकाला येत असतील.काहीजण एकमेकांना भेटून आजचा फ्रेंडशिप डे साजरा करत असतील.तर काहीजण एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन आजचा दिवस साजरा करत असतील. पण टीव्ही मालिकांमधील सेलिब्रिटी आजचा दिवस कसा साजरा करणार आणि फ्रेंडशिप डे बद्दल काय आहेत त्यांची मतं आपण जाणून घेऊया ..!
मालिका ‘जीजाजी छत पर कोई है’मध्ये सीपीची भूमिका साकारणारी हिबा नवाब म्हणाली, ”प्रत्येकाच्या जीवनामध्ये विविध मित्र असतात. पण मी अत्यंत नशीबवान आहे की माझी जिवलग मैत्रिण राशी बावा ही माझ्यासोबत ‘जीजाजी छत पर कोई है’मध्ये काम करते व माझी सह-कलाकार आहे. आमच्यामध्ये अद्भुत नाते आहे आणि आमचा एकमेकींवर खूप विश्वास आहे, ज्यामुळे आम्ही एकमेकींसोबत बराच वेळ व्यतित करतो. ती आसपास असताना मला खात्री मिळते की माझ्या सर्व समस्यांसाठी सोल्यूशन मिळणार. यंदा फ्रेण्डशीप डे निमित्त मी मित्रांसोबत लंच करण्याची योजना आखली आहे. हा दिवस आपलयामधील साहचर्याला साजरे करण्यासाठी आहे. या दिवशी धमाल करण्यासोबत मी माझ्या मित्रमैत्रिणींना भेटणार आहे आणि मला आवडणा-या लोकांसोबत हा दिवस साजरा करणार आहे.”
मालिका ‘जीजाजी छत पर कोई है’मध्ये जितेंद्र जामवंत जिंदालची भूमिका साकारणारा सुभाषिश म्हणाला, ”देव तुमच्या मित्रांच्या माध्यमातून तुमच्यावर प्रेम करतो – या वाक्याने माझे लक्ष वेधून घेतले आणि माझा या मताला दुजोरा आहे. माझ्यासाठी फ्रेण्डशीप डे म्हणजे मी माझ्या दोन जिवलग मित्रांना भेटलो. अनंत व भानू हे कॉलेजच्या दिवसापासून माझे मित्र आहेत आणि मी त्यांना ११ वर्षांपासून ओळखतो. इंजीनिअरिंग शिक्षणाच्या चार वर्षांमध्ये मित्रच तुमचे कुटुंब असतात आणि माझ्या बाबतीत देखील असेच घडले. हे दोघे माझ्यासाठी कुटुंबासारखे आहेत. माझ्या कॉलेजमधील शेवटच्या सेमिस्टरदरम्यान मी वीकेण्ड अभिनय कोर्ससाठी मणिपालमधून मुंबईला यायचो. मी माझा जिवलग मित्र भानू सोबत सर्वकाही शेअर करायचो. मला आजही आठवते, मी अभिनयामध्ये माझे करिअर घडवणार असल्याचे भानूला सांगितले तेव्हा भानूने माझ्या करिअरच्या संदर्भात अत्यंत भावनप्रवण लेख लिहिला होता. त्यामध्ये लिहिले होते की, त्याची मला मासिकच्या कव्हरपेजवर पाहण्याची इच्छा आहे. मी मुंबईला जाण्यापूर्वी त्याने शुभेच्छा टोकन म्हणून त्याच्या पॉकेटमनीमधून लिफाफ्यामध्ये १००० रूपयाची नोट देखील ठेवली होती. ते पत्र माझ्यासाठी बहुमूल्य आहे आणि ते अजूनही माझ्याकडे आहे. यंदा मी त्यांच्यासोबत फोन किंवा व्हिडिओ कॉलवरून फ्रेण्डशीप डे साजरा करणार आहे. माझ्याकडून माझे सर्व मित्र व चाहत्यांना फ्रेण्डशीप डेच्या आनंदमय शुभेच्छा.”
मालिका ‘मॅडम सर’मध्ये करिष्माची भूमिका साकारणारी युक्ती कपूर म्हणाली, ”फ्रेण्डशीप डेचे माझ्या मनात खूप खास स्थान आहे. या दिवशी आपण आपल्या प्रियजनांसोबतच्या नात्याला साजरे करतो. माझ्या मित्रमैत्रिणींसोबतची संस्मरणीय आठवण म्हणजे मी त्यांच्यासोबत शालेय सहलीमधून म्युझियमला गेले हेाते आणि आम्ही तेथे फ्रेण्डशीप डे साजरा केला. ही आठवण मी कधीच विसरणार नाही. आम्ही तेथे घरी बनवलेल्या भोजनाचा आस्वाद घेत आणि खूप धमाल करत दिवस साजरा केला. यावेळी मी माझा जिवलग मित्र म्हणजेच माझ्या भावासोबत हा खास दिवस साजरा करणार आहे. आम्ही लंच किंवा डिनरला जाऊ. माझे चाहते देखील माझ्यासाठी मित्रांसारखे आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी आज या टप्प्यापर्यंत पोहोचू शकली आहे. त्यांनी दिलेले प्रेम व आपुलकीसाठी मी त्यांचे आभार मानते.”