पर्यावरणाची काळजी घेऊन प्लेटिंग उद्योग पूर्ववत चालू करा – छगन भुजबळ

0

नाशिक – गेल्या दीड वर्षां पासून कोरोनाचे संकट सुरु असून अनेक उद्योगधंदे बंद आहे, अशा वेळी पुन्हा उद्योग बंद ठेवणे परवडणारे नाही. त्यामुळे प्लेटिंग उद्योगांशी चर्चा करून पर्यावरणाची काळजी घेत उद्योग तात्काळ सुरु करण्यात यावे असे आदेश राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे.
 
नाशिक येथील कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आयमा संघटनेच्या पदाधिकारी व प्रदूषण नियत्रण मंडळ अधिकारी, एमआयडीसी अधिकारी यांच्यासमवेत आज बैठक पार पडली. या बैठकी प्रसंगी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, उद्योजक धनंजय बेळे, निखिल पांचाल, राजेंद्र अहिरे,  समीर पटवा, इन्दंरपाल सहानी, सुदर्शन डोंगरे, राधाकृष्ण नाईकवाडे, आशिष कुलकर्णी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रवीण जोशी, सह प्रादेशिक अधिकारी दुर्गुळे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
 
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र प्रदूषण विभागाचे सचिव अशोक शिनगारे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत. प्रदूषण मंडळाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करत नाशिक मधील उद्योग तात्काळ सुरु करण्यात यावे. याबाबत उद्योजक आणि अधिकारी यांनी समन्वय साधून सदरचा प्रश्न मार्गी लावावा अशा सूचना केल्या. तसेच राज्यभरात वेगळी नियमावली व नाशिकमध्ये वेगळी नियमावली लावली जाऊ नये महाराष्ट्र भरात सर्वांना एकच नियमावली लावण्यात यावी असे आदेश दिले. तसेच याबाबत मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे बैठक घेऊन याबाबत लवकरच तोडगा काढला जाईल असे आश्वासन उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.