हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे निधन

0

नवी दिल्ली – तामिळनाडूतील कुन्नूर येथे  जनरल बिपीन रावत यांना झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे काही वेळा पूर्वी निधन झाले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

दुर्घटनेत जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर बंगळुरु येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. दुर्घटनेत जनरल बिपिन रावत यांच्यासह इतर १३ जणांचा मृत्यू झाला होता. यावेळी फक्त ग्रुप कॅप्टन वरुण सिंग दुर्घटनेतून बचावले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते लवकर बरे व्हावेत यासाठी संपूर्ण देशभरातून प्रार्थना केली जात होती. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान बुधवारी त्यांचं निधन झालं.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.