डाळींबाचे आरोग्यास फायदे 

डॉ.राहुल रमेश चौधरी 

0

डॉ.राहुल रमेश चौधरी 
आयुर्वेदात आंबट परंतु पित्त न वाढवणारे पित्त शांत करणारे दोनच फळ आहे एक म्हणजे आवळा आणि दुसरे म्हणजे डाळिंब.डाळींबाचा उपयोग साहित्यात कवींच्या साहित्याला कल्पनातीत व काव्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी डाळींब त्याचे फूल याचे उपयोग उपमा स्वरूपात वापर केला जातो.त्याचप्रमाणे शरीराचे सौंदर्य व आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी डाळिंबाचा विशेष उपयोग होतो.डाळींबाचा नियमीत वापर करणे योग्य आहे.डाळींबाचा बी,साल,कोवळी पाने,फूल,फळांची साल, या सर्वांचा वापर उपयुक्त समजले जाते.डाळींब नैनीताल,अल्मोडा,गढवाल या प्रदेशात सर्वाधिक होतात.डाळींब हे गुणांच्या दृष्टीने काबूल,अफगाणिस्तान,पर्शिया येथील गुणसंपन्न मानले जातात.डाळीबांचे गुणधर्म आपण या सदरात पाहूयात.

डाळीबांचे गुणधर्म
१.गोड डाळींब हे श्रेष्ठ आहेत ते पित्ताचे शमन उत्कृष्ट करतात,परंतु आंबट डाळींब पित्तास वाढवीत नाही परंतु विशेष कमीही करीत नाही.
२.गोड डाळींबाच्या फळ रस हा उत्तम तृप्तिकर पेय मानले जाते.शरीरातील आयुर्वेदानुसार प्रथम असा रस धातु चे याने उत्तम पोषण होते.
३.पोटात सतत आग होणे,आंबट ढेकर येणे,लघवीला जळजळ होते अश्या कारणांसाठी डाळींबाचा रस व खडीसाखर याने कमी करण्यासाठी वापरता येते.
४.पित्ताची वाढण्याची अनेक कारणे आहेत त्यापैकी अनियमीत काळी जेवणे,सतत बेकरीचे पदार्थ ,आंबवलेले पदार्थ इत्यादी आहेत याने पित्ताची तीव्रता तीक्ष्णता वाढते ही तीव्रता तीक्ष्णता डाळींबाच्या रसाने कमी होते.
५.विविध प्रकारच्या व्यवसायांमुळे डोळ्यांवर ताण पडतो यासाठी डाळींबाचा रस उपयुक्त आहे.डाळीबांचा रसाचे थेंब देखील डोळ्यात टाकून हा त्रास कमी करता येते.

६.ताप खूप असताना तहान फार लागते लघवीस आग होते यावेळेला डाळींबाचा रस थोड्या थोड्या वेळाने सतत घ्यावा.
७.गरोदर असताना सुरुवातीच्या काही महिन्यात सतत कोरडे उम्हासे,उलट्या होतात,याने प्रचंड अशक्तपणा येतो,तो कमी करण्यासाठी उलट्या न होण्याची औषधे न घेता डाळींबाचा रस घ्यावा,याने फायदा होतो.
८.दातांचे आरोग्य योग्य राहण्याकरीता सालीचे चूर्ण मंजना प्रमाणे वापरावी याने दात स्वच्छ होतात.हिरड्या पक्क्या होतात,त्यातून रक्त येत नाही.
९.सतत आव पडणे,चिकट शौचाला होणे यावर फळाच्या सालीचे चूर्ण कोमट पाण्यासह घ्यावे.
१०.सतत जंत होणे,यावर डाळींबाच्या सालीचा चूर्णाचा विशेष उपयोग होतो.

११.अनेक वेळा टॉन्सिल वाढणे,घसा दुखणे,घसा लाल होणे, यावर डाळींबाच्या सालीचा काढा हळद टाकून गुळण्या केल्यास लाभ दिसतो.
१२.डाळींबाच्या झाडाची सालीचा काढा करून घेतल्यास त्यानंतर एरंडेल घ्यावे याने आतड्यांतील सर्व प्रकारचे कृमी नष्ट होतात.
१३.जुलाब सातत्याने होत असल्यास डाळींबाच्या झाडाच्या सालीचे चुर्ण कोमट पाण्यासह द्यावे याने जुलाब बंद होवून शौचास बांधून होते.
१४.तोंडास वारंवार पाणी सुटणे,थुंकी तयार होणे,सतत कफाचा चिकटपणा होणे याकरीता डाळींबाच्या झाडाच्या सालीचे चूर्ण मधासह घ्यावे.
१५.नाकातून उन्हामुळे रक्त येत असल्यास डाळींबाच्या झाडाच्या ओल्या सालीचा रस नाकात टाकल्यास रक्त येणे थांबते.

१६.शरीरास जास्त घाम येत असल्यास व त्या घामाने दुर्गंध येत असल्यास डाळींबाच्या पानांचा रस अंगास चोळावा व स्नान करावे याने त्वरीत फायदा होतो,शरीराचे अंगावयव बळकट,सुपुष्ट होण्याकरीता रसाचा व पानांचा कल्क लावावे.
१७.डोळे आल्यास किंवा या साथीच्या प्रकारात डोळ्यातून चिकट स्त्राव येणे,डोळे खाजवणे असे लक्षणे असल्यास पानांची कल्क पापणीवर लावावे.
१८.नाकातून रक्त येत असल्यास डाळींबाच्या फूलाचे चुर्ण नाकात टाकावे.
१९.शरीरावर जखम होवून रक्त येत असल्यास या जखमेवर फूलाचे चूर्ण पसरावे याने रक्तस्त्राव कमी होते.
२०.अनेक स्त्रीयांना अंगावरून पांढरे जाणे अश्या तक्रारी असतात यात डाळींबाच्या फूलाचे चुर्ण घ्यावे.

२१.जुलाब होत असल्यास फूलाचे चूर्ण घ्यावे.
२२.राजयक्ष्मा च्या रुग्णांमध्ये रक्त पडत असल्यास डाळींबाच्या फुलाचे चूर्ण व अडुळसा पानांचा रस द्यावा.

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी

औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र   

संपर्क-९०९६११५९३०

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.