थंडीत खाण्याच्या पदार्थात आणि पद्धतीत बदल करा, तुम्ही निरोगी राहाल

0

हिवाळा आला आहे आणि हिवाळ्यात रोगराई टाळायची असेल तर आहार आणि खाद्यपदार्थांमध्ये बदल करा. त्यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहाल तर ताजेतवानेही व्हाल. हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते. गुलाबी थंडीने सुरुवात झालेल्या हिवाळ्यात आरोग्यात अनेक चढ-उतार असतात. त्यामुळे सर्व प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो. असे आरोग्य तज्ञ सांगतात. सूक्ष्मजंतू च्या वाढीसाठी थंड हवामानअनुकूल असते.

याशिवाय तापमानात घट झाल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते. हेच कारण आहे की आरोग्य तज्ञ सर्व लोकांना निरोगी आणि पौष्टिक आहाराची शिफारस करतात. हिवाळ्याच्या हंगामात रोग टाळण्यासाठी योग्य अन्न आणि पोस्टिक पदार्थ निवडणे खूप महत्वाचे आहे. चला जाणून घेऊया अशा पदार्थांविषयी, जे थंडीच्या मोसमात टाळावेत.

आहार तज्ञांच्या मते, थंडीच्या मोसमात त्या पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे, ज्यांचा प्रभाव थंड असतो. यामध्ये नारळ पाणी, ताक, दही इ. हिवाळ्यात या गोष्टींचे सेवन केल्याने घसा दुखू शकतो, तर ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांना या मौसमी आजारांचा धोका असतो. म्हणूनच थंडीत गरम पदार्थ खा. उदाहरणार्थ, जेवणासोबत गूळ, टोमॅटोचा रस आणि इतर हंगामी भाज्या सुकामेवा इ.

थंडी पडायला सुरुवात झाली की आपल्याकडे लगेच सुकामेवा, पौष्टीक लाडू यांसारखे पदार्थ खायला सुरुवात होते. सुकामेव्यात अक्रोड हा घटक ही महत्वाचा आहे.अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ले तर त्याचे गुणधर्म आणखी वाढतात. सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड खाणे जास्त फायदेशीर आहे. यामुळे अनेक आजार आपल्यापासून दूर राहतात.
भिजवलेले अक्रोडखाल्ल्याने  रोगप्रतिकारशक्ती वाढते – तुम्ही रोज अक्रोड खात असाल तर त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. यामुळे आजारांपासून आपला बचाव होतो.

अक्रोडमुळे वजन नियंत्रित राहते – भिजवलेल्या अक्रोडचे नियमित सेवन केल्यानेही वजन नियंत्रित राहते. जर तुमचे वजन जास्त असेल आणि तुम्ही नियमितपणे अक्रोड खात असाल तर ते तुमचे वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. अक्रोड खाल्ल्याने आपल्या शरीरातील चयापचय क्रिया वाढते, ज्यामुळे अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत होते.

त्याच प्रमाणे सुकामेव्यातील सगळ्यात महत्त्वाचा आणि सर्रास वापरला जाणारा घटक म्हणजे बदाम. आता हा बदाम आरोग्यासाठी किती फायदेशीर असतो याबाबत आपल्याला माहिती असते. पण हे बदाम कसे खावेत, कोणी, कधी, किती खावेत याचे काही नियम आहेत. हे नियम पाळल्यास बदाम खाण्याचे शरीराला अतिशय उत्तम फायदे होता. मात्र कोणत्याही वेळेला, चुकीच्या पद्धतीने बदाम खाल्ल्यास त्याचा आरोग्याला फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो. त्यामुळे आहार घेताना त्याचे नियम, शरीरासाठी असणारे फायदे-तोटे, अतिसेवनामुळे होणारे परिणाम यांबाबत पुरेशी माहिती असायला हवी.

नियमित बदाम खाल्ल्याने त्वचा, केस चांगले होण्यास मदत होते. बदामामुळे मेंदूचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते, बदाम खाल्ल्याने हृदयरोग, मधुमेह यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. दातांचे आणि हाडांचे आरोग्य चांगले राखण्यास बदाम उपयुक्त ठरतात.कच्चे बदाम हे पचनासाठी जड असतात, त्यामुळे ते थेट खाल्ल्यास पचनशक्तीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. हेच बदाम भिजवून खाल्ल्यास ते पचायला हलके होतात आणि त्याचा शरीराला चांगला फायदा होण्यास मदत होते.

दिवसभरात कधीही बदाम खाण्यापेक्षा सकाळी उठल्यावर किंवा ब्रेकफास्टच्या वेळी हे भिजवलेले बदाम खाणे केव्हाही फायद्याचेच ठरते. सकाळी त्यातील सर्व घटक योग्य पद्धतीने शरारीत शोषले जातात तसेच पोट भरल्यासारखे वाटते. एका दिवसात ६ ते ७ पेक्षा जास्त बदाम खाऊ नयेत. त्यामुळे उष्णता वाढून त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात.

मांस किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ
हिवाळ्यात मांसासारखे खाद्यपदार्थ देखील टाळावेत. त्या पचायला शरीराला जास्त वेळ लागतो,असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्यामुळे शरीरात पचनाच्या समस्या आणि लठ्ठपणा वाढू शकतो. थंड हंगामात प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन कमी करण्याचा देखील सल्ला तज्ञांकडून दिला जातो.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.