
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
निज ज्येष्ठ शुक्ल पंचमी / संध्याकाळी ५.०० नंतर षष्ठी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
⏰ राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
✨ “आज चांगला दिवस आहे.”
🌙 चंद्रनक्षत्र – आश्लेषा / सकाळी १०.०७ नंतर मघा.
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क / सकाळी १०.०७ नंतर सिंह. (हर्षण योग, नक्षत्र गंडांत शांती)
🔭 रवी लाभ चंद्र.
🔭 चंद्र केंद्र मंगळ.
🔭 चंद्र केंद्र हर्षल.
🪔 राशिभविष्य -(Marathi Rashi Bhavishya)
मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) लाभदायक दिवस आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत चांगल्या संधी मिळतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नवीन योजना यशस्वी होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) घरगुती वातावरण आनंददायी राहील. कुटुंबीयांसोबत वेळ घालवाल. मालमत्तेशी संबंधित कामात प्रगती होईल. मानसिक समाधान लाभेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) संवाद कौशल्याचा लाभ होईल. भावंडांचे सहकार्य मिळेल. लहान प्रवास लाभदायक ठरतील. नवीन संपर्क भविष्यात फायदेशीर ठरतील. उत्साह वाढेल.
कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) राशीस्थानी चंद्रामुळे आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. आरोग्य चांगले राहील. मन प्रसन्न राहील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) सकाळनंतर चंद्र राशीस्थानी येत असल्याने उत्साह वाढेल. नवीन कार्याचा प्रारंभ करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रतिष्ठा वाढेल.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) खर्च वाढण्याची शक्यता आहे. अनावश्यक वाद टाळा. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. संयम लाभदायक ठरेल.
तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल. नवीन योजना मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल. इच्छित कामे पूर्ण होतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. प्रतिष्ठा वाढेल. महत्त्वाचे निर्णय लाभदायक ठरतील.
धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) भाग्याची उत्तम साथ मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. प्रवासाचे योग संभवतात. विद्यार्थ्यांना यश मिळेल. गुरूजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अनपेक्षित खर्च संभवतो. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. संयम आणि शांतता राखल्यास लाभ होईल. संशोधनात्मक कामात यश मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) भागीदारीच्या कामात यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. नवीन करार आणि व्यवहार लाभदायक ठरतील. आर्थिक स्थिती सुधारेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) कामाचा ताण वाढू शकतो, परंतु मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. विरोधकांवर मात कराल. नियमित कामकाजातून लाभ मिळेल. दिवस समाधानकारक जाईल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)



