मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने काही दिवस विश्रांती घेतली असली तरी येत्या आठ ते नऊ जुलैला पावसाचे पुनरागमन होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
मान्सूनचे आगमन झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी पेरणीलाही सुरुवात केली होती.परंतु आता आठवड्याभराने मान्सून पुन्हा सक्रिय होणार ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार,येत्या पाच दिवसात पावसाची शक्यता आहे. सात आणि आठ जुलै रोजी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा पाऊस सामान्यदेखील असू शकतो. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भामध्ये या दोन्ही दिवशी ढगांच्या गडगडाटासह पाऊस हजेरी लावेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
4 Jul, Severe weather warning issued by IMD for Maharashtra today for coming 5 days indicate D4, D5; 7 & 8 July, there is possibilities of enhanced 🌩🌩thunderstorm activities at many places especially int. This could be associated with mod rains too🌧.
Watch for IMD updates then pic.twitter.com/CsoDCXZyFD— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 4, 2021