माजी नगरसेवक मदनलाल रावल यांचे निधन 

0

नाशिक – नाशिक महानगर पालिकाचे माजी नगरसेवक मदनलाल रावल यांचे आज त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले.ते ८६ वर्षांचे होते.

नाशिक महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले मदनलाल रावल पंजाबी समूहातील ते पहिले नगरसेवक होते. उद्योजक असलेले रावल स्वतःचा दांडगा जनसंपर्क आणि समाजसेवेच्या बळावर अल्पसंख्य असूनही राजकारणात ठसा उमटवू शकले.

त्यांच्या पश्चात १ मुलगा-सून, नातू असा परिवार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत त्यांच्यावर नाशिक येथीलअमरधाम स्मशानभूमीत  उद्या (५ जुलै) रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.