नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होतांना दिसत असून आज रविवारी देशात ४३ हजार ०७१ नवीन रुग्ण आढळे आहेत. तर ५२ हजार २९९ जण कोरोना मुक्त झाले आहेत,केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविरारी गेल्या २४ तासांतील करोना रुग्णांसंबंधीची आकडेवारी जारी केली.
गेल्या २४ तासात ९५५ जणांना आपला जीव गमवावा लागला.आतापर्यंत देशात ४ लाखाहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.कोरोनामुक्त होण्याचेही प्रमाण वाढत असून देशात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन ४,८५,३५० पर्यंत आली आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर हा वाढून ९७.०९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आठवड्याची संसर्गाची टक्केवारी ही २.४४ टक्के आहे तर रोजचा संसर्ग दर हा २.३४ इतका आहे. ही टक्केवारी गेल्या २७ दिवसांपासून ५ टक्क्यांनी कमी झाली आहे. देशात लसीकरण मोहीमेने वेग घेतल्याचं समोर आलं आहे. सरकारी आकड्यांनुसार गेल्या २४ तासांत ६३,८७,८४९ जणांना डोस देण्यात आला.आतापर्यंत देशात एकूण ३५,१२ कोटी नागरिकांनी लस घेतली आहे. चाचण्याही वाढवण्यात आल्या आहेत. एकूण ४१.८२ कोटी चाचण्या झाल्या आहेत.