येत्या ५ दिवसात मान्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता !

महाराष्ट्रात "या" दिवशी दाखल होणार मान्सून

0

मुंबई,दि,२७ मे २०२४ –दरवर्षी १ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो.मात्र,यंदा मान्सून काहीसा लवकर दाखल होण्याची अपेक्षा असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता परंतु ‘रेमाल’ या भीषण चक्रीवादळामुळे थोडा मान्सूनला थोडा उशीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.परंतु मान्सूनच्या आगमनाची प्रतिक्षा करणाऱ्या सर्वांसाठीच खूशखबर आहे.अंदमान-निकोबारमध्ये दाखल झालेला मान्सून हळूहळू पुढे सरकरत असून लवकरच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, येत्या पाच दिवसांत केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याची माहिती आयएमडीने दिली आहे.

पुढील पाच दिवसात केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.केरळमध्ये मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याची माहिती आयएमडीने दिली आहे. मान्सून मालदीव, कोमोरिन,बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्र या भागात १९ मेपर्यंत मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं या आधीच दिली आहे.

महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर पुढच्या आठवड्यात मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने राज्याच्या विविध भागात हजेरी लावली आहे. यंदा मान्सूनचा पाऊस सामान्य राहील, यंदा सरासरीच्या १०६ टक्के मान्सून होईल, असा अंदाज देखील भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.

महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.तर १० ते ११ जून दरम्यान मुंबईत मान्सूनचं आगमन होण्याची अपेक्षा आहे.

https://x.com/ANI/status/1795064201893093781?r

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.