नाशिक छायाचित्रकार संघटनेच्या वतीने ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान व १५० छायाचित्रकारांचे लसीकरण
नाशिक – जागतिक छायाचित्रण दिनानिमित्ताने नाशिक छायाचित्रकार संघटना आयोजित कार्यक्रमांमध्ये संघटनेच्यावतीने नाशिक मधील २९ जेष्ठ व उत्कृष्ट फोटोग्राफी क्षेत्रामध्ये काम व पारितोषिके मिळवलेल्या व संघटनेला नेहमी सहकार्य व पाठींबा देणाऱ्या छायाचित्रकारांचा सन्मानपत्र व शाल श्रीफळ देऊन नाशिक महानगरपालिकेचे सन्माननीय हस्ते महापौर श्री. सतीश (नाना) कुलकर्णी तसेच नाशिक छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष श्री संजय जगताप संस्थापक अध्यक्ष श्री हिरामण सोनवणे व सर्व कमिटी मेंबर यांच्या उपस्थितीत माननीय महापौर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी महापौर महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले ज्येष्ठ व उत्कृष्ट छायाचित्रकारांनचा सन्मान संघटनेच्यावतीने करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलून माझ्या हस्ते नाशिक शहरातील माझ्या ज्येष्ठ छायाचित्रकार मित्रांचा सन्मान होतोय याचा मला आनंद वाटतो त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात नाशिक छायाचित्रकार संघटनेचे कार्य एका वेगळ्या उंचीवर आहे तसेच अध्यक्ष संजय जगताप यांचे देखील हे काम उल्लेखनीय असून मी आज या कार्यास माझ्या तर्फे तसेच नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शुभेच्छा देतो असे प्रतिपादन माननीय महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी केले
याप्रसंगी कलादालन कालिदास कला मंदिर नाशिक येथे करण्यात आले १५० छायाचित्रकार व त्यांच्या परिवारातील सदस्यांना “कोविडशिल्ड” चा पहिला व दुसरा डोस उपलब्ध नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, डॉक्टर अजिता साळुंखे ,अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रवीण अष्टेकर व डॉक्टर राजकुमार दायमा ,यांच्या सहकार्याने नाशिक मधील छायाचित्रकारांना लस उपलब्ध करून देण्यात आली याप्रसंगी माननीय महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी नाशिक छायाचित्रकार संघटनेच्यावतीने आज ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हिरामण सोनवणे अध्यक्ष संजय जगताप सेक्रेटरी सुरेंद्र पगारे उपाध्यक्ष पंकज अहिरराव सह सेक्रेटरी नंदू विसपुते सल्लागार प्रताप पाटील ,वामनराव दंदी, कमिटी मेंबर किरण मुर्तडक,दिनेश वैष्णव ,विलास अहिरे , गिरिष भोळे, प्रशांत तांबट,धनराज पाटील , सौरभ अमृतकर, संदीप भालेराव , सुनील जगताप, रवींद्र गवारे , पंकज जोगळेकर , योगेश चव्हाण ,आदि छायाचित्रकार या वेळी उपस्थित होते.