नाशिक,दि,२७ नोव्हेंबर २०२४ –नाशिक स्मार्ट सिटी कंपनी व मनपा पाणी पुरवठा वितरण विभागामार्फत मनपाचे विविध जलशुध्दीकरण केंद्रे, विविध बुस्टर पंपींग स्टेशन येथे विविध ESR येथे फ्लोमीटर्स,व्हॉल्व्स बसविणे अशी कामे नाशिक महानगर पालिका क्षेत्रात होणार असल्याने शनिवार दि. ३०/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० ते रात्री ०८.०० वाजे पर्यंत शट डाऊन घेण्यात येणार आहे.त्यामुळे शनिवार दि. ३०/११/२०२४ रोजी संपूर्ण नाशिक शहरास पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही.तसेच रविवार दि.०१/१२/२०२४ रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.अशी माहिती नाशिक महानगर पालिकेचे अधीक्षक अभियंता (यां) यांनी एका पत्रकाद्वारे कळवले आहे.
खालीलप्रमाणे कामाचे नियोजन करण्यात आलेले आहे.
१. पंचवटी जलशुद्धीकरण केंद्रः एच टी पोल शिफ्ट करणे.
२. गांधी नगर जलशुद्धीकरण केंद्र: फ्लोमीटर बसविणे.
३. नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्र: विविध ठिकाणी फ्लोमीटर, व्हॉल्व बसविणे.
४. शिवाजी नगर जलशुद्धीकरण केंद्र: विविध ठिकाणी फ्लोमीटर बसविणे.
५. बूस्टर पंपिंग स्टेशनः विविध ठिकाणी फ्लोमीटर बसविणे,
६. सातपूर विभागातील ९०० मि.मी. फीडर पाइपलाइनवरील जलकुंभावर व्हॉल्व व वॉटर मीटर बसविणे.
७. सातपूर प्रभाग क्र. ०९ मधील कार्बन नाका संदीप प्लास्टीक वॉल कंपाऊंडलगत शुध्द पाण्याच्या ५०० मि.मी. पीएससी पाइपलाइन वरील पाणी गळती बंद करणे.
८. प्रभाग क्र. १० मधील भारत गॅस एजन्सीसमोर अशोक नगर येथे ९०० मि.मी. DI पाइपलाइनवरील पाणी गळती बंद करणे.
९. गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक येथील रॉ वॉटर पाइपलाइन पाणी गळती बंद करणे व पाथर्डी फाटा येथील ६०० मि.मी. व्हॉल्व दुरुस्ती करणे.
१०. कशिश हॉटेलजवळील ७०० मि.मी. पाइपलाइनवरील व्हॉल्व लिकेज बंद करणे तसेच हॉटेल रेडिसन ब्लू येथील आनंद नगर टाकीच्या पाइपलाइनवरील पाणी गळती बंद करणे.
११. स्मार्ट सिटी कंपनी मार्फत वासन नगर ESR, राणीनगर ESR, पाथर्डी फाटा GSR येथील पाइपलाइनवर व्हॉल्व बसविणे व इतर अनुषंगिक कामे करणे.
१२. नाशिकरोड विभागातील उपनगर इच्छामणी मंगल कार्यालयाजवळ संजय गांधी नगर रॉ वॉटर पाइपलाइन लिकेज बंद करणे.
१३. पवारवाडी जलकुंभ भरणारी उर्ध्ववाहिनी जेलरोड सिग्नलजवळ लिकेज बंद करणे.
तरी शनिवार दि.३०/११/२०२४ रोजी संपूर्ण दिवसभर पूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहील.तसेच रविवार दि. ०१/१२/२०२४ रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे,असे आवाहन नाशिक महानगर पालिके तर्फे करण्यात आले आहे.