शनिवारी ‘आद्या : प्रथम शक्ती’शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन

0

नाशिक,दि,४ ऑक्टोबर २०२४ -‘‘आद्या :प्रथम शक्ती’ या शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे उद्या शनिवार दि,५ ऑक्टोबर ला आयोजन करण्यात आलेले आहे.ह्या कार्यक्रमामध्ये नाशिकच्या सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना डॉ.सुमुखी अथणी व किर्ती भवाळकर तसेच भरतनाट्यम नृत्यांगना सारिका खांडबहाले ह्यांच्या विद्यार्थिनी नृत्यप्रस्तुती करणार आहेत. कला क्षेत्रातील ज्येष्ठ गुरूंनी एकत्र येऊन त्यांच्या शिष्यांच्या कलागुणांना वाव मिळावा असा ह्या कार्यक्रमाचा मानस आहे.

अनंत नृत्यम’ हा युवा कथक कलाकारांचा समूह जो शास्त्रीय नृत्याच्या प्रचार आणि प्रसाराचे काम विविध माध्यमातून करण्यासाठी प्रयत्नशील असतो,या समूहातर्फे नवरात्री निमित्त हा कार्यक्रम संध्याकाळी ५.३० वाजता शौनकाश्रम,पंचवटी येथे संपन्न होणार आहे.सर्वांना मुक्त प्रवेश असलेल्या या कार्यक्रमासाठी रसिक प्रेक्षकांनी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Kirti Jadhav Nashik
Kirti Jadhav Nashik

आजचा रंग – हिरवा
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा

 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.