आजचे राशिभविष्य शनिवार,१३ जुलै २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक १३ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
आषाढ शुक्ल सप्तमी/अष्टमी.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज दुपारी ३.०० पर्यंत चांगला दिवस आहे”
नक्षत्र: हस्त.
आज जन्मलेल्या बाळाची राशी- कन्या.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र बुध लाभ योग आहे. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक चिंता मिटतील. लेखकांना उत्तम दिवस आहे.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. कुटुंबासाठी खरेदी होईल. संतती कडून खुश खबर मिळेल. वक्तृत्व चमकेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. नोकरीत सर्वांना खुश कराल. प्रवासात आनंद मिळेल. आरोग्य सांभाळा. मानापमानाचे प्रसंग येतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवस अनुकूल आहे. मनासारखी कामे पार पडतील. व्यावसायिक लाभ होतील. नवीन खरेदी होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक लाभ वाढतील. बौद्धिक क्षेत्र गाजवाल. नवीन संधी चालून येतील. खुशखबर मिळेल.

कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. कामाचा पसारा वाढेल. आर्थिक लाभ होतील. मेजवानी मिळेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक दृष्टीने संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. सौख्य लाभेल. नोकरीच्या ठिकाणी उत्तम लाभ होतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) चंद्र अनुकूल आहे. गुंतवणुकीतून लाभ मिळतील. सामाजिक कार्यात यश मिळेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरी/ व्यवसायात अनुकूलता वाढेल. आर्थिक लाभ होतील. सौख्य लाभेल. शत्रू प्रबळ होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल आणि उत्साही दिवस आहे. स्वप्ने पूर्ण होतील. शत्रू पराभूत होतील. गुरुचे सहकार्य लाभेल.

कुंभ:– (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. खर्च वाढतील. गुंतवणूक करताना काळजी घ्या.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रवासातून लाभ होतील. मनासारखी कामे होतील. आर्थिक नियोजन करा. शेअर्स किंवा लॉटरी मधून लाभ होतील.

१३ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
तुमच्यावर हर्षल, चंद्र आणि नेपच्यून या तीन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची उंची चांगली असते आणि तुम्ही दिसायला आकर्षक असतात. तुम्ही बुद्धिमान असून तुमचा स्वभाव विचारी असतो आणि तुमच्या मध्ये आपुलकीची भावना असते. तुम्हाला चांगल्या दर्जाची नोकरी मिळते आणि उत्तम पैसा मिळतो. वयाच्या ३१ वर्षानंतर तुमचा भाग्यदायी होतो. तुम्ही दिसायला गरीब असला तरी मनातून हट्टी असतात. इतरांना तुमच्या सहवासात आनंद मिळतो आणि हे बघून तुम्हाला समाधान लाभते. बुद्धिमान वर्तुळात वावरणं तुम्हाला आवडते. स्वतःच्या अती आक्रमक स्वभावाला तुम्ही आळा घातला पाहिजे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनेक चळवळीचा अनुभव घेतात.

तुम्हाला खोटेपणा आवडत नाही. तुमच्यामध्ये एक या अंकाचे देखील सर्व गुण असतात मात्र तुम्ही त्या लोकांन इतके धीट नसतात. संधी मिळाल्यास तुम्ही तुमची क्षमता दाखवू शकतात. हर्षल आणि चंद्र यांच्या एकत्रित पणामुळे अडचणींवर मात करणे जरा कठीण जाते. तुमचे विचार स्वतंत्र असतात त्यामुळे तुम्ही कधी कधी चमत्कारिक कृती करतात. बऱ्याच वेळा तुम्हाला नातेवाईकांकडून उपद्रव होण्याची शक्यता असते. कोर्ट कचऱ्याशी तुमचा संबंध येतो. वैवाहिक जोडीदाराची निवड करताना तुम्ही अधिक काळजी घेतली पाहिजे. शक्यतो तुम्ही भागीदारी व्यवसाय टाळायला पाहिजे. मानव जातीच्या कल्याणासाठी आपल्या बुद्धीचा उपयोग व्हावा असे तुम्हाला मनापासून वाटते. तुम्ही पद्धतशीर वागतात. तुम्हाला अनेक गुप्त शत्रू निर्माण होतात आणि ते तुमच्याबद्दल गैरसमज पसरवतात. झटपट पैसा मिळावा असे तुम्हाला वाटत असले तरी तुम्ही जुगारी वृत्ती टाळली पाहिजे. तुम्ही भूतकाळात जास्त रमतात आणि तुमच्या कर्तृत्वाबद्दलच्या कल्पना भरमसाठ असतात. तुमचा स्वभाव अस्थिर असतो आणि वागण्यामध्ये विरोधाभास जाणवतो.

व्यवसाय:-तुम्हाला सर्वच क्षेत्रांमध्ये यश मिळते मात्र पोलीस,सैन्य,गुप्तहेर,राजकारण,डॉक्टर,केमिस्ट,लोखंड संबंधित,अग्नी संबंधित यंत्रसामग्री यात यश मिळते.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार.
शुभ रंग:-तांबडा.
शुभ रत्न:-पुष्कराज, मोती, माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.