सेन्सेक्स ३९७ अंकांनी वधारला

0

विश्वनाथ बोदडे, नाशिक
आज जागतिक स्तरावरील सर्वच बाजार सकारात्मक होते त्याचाच परिणाम सकाळी बाजार उघडला तेव्हा सिंगापुर निफ्टीच्या संकेतांच्या आधारावर भारतीय शेअर बाजार सुद्धा सकारात्मक उघडला परंतु काही वेळात वरच्या स्तरावर नफा वसुली सुरू झाली परंतु बाजाराला आयटी टेक्स्टाईल फार्मा बँकिंग या समभागांमध्ये चांगली खरेदी दिसल्यामुळे आणि दुपारच्या सत्रात एशियन मार्केट सकारात्मक उघडल्यामुळे भारतीय बाजारात पुन्हा तेजीचे वातावरण दिसले व त्याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स 397 अंकांनी वधारून 52769 या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 व भागांचा निर्देशांक दीप्ती सुद्धा 120 अंकांनी वधारून 15812 या पातळीवर बंद झाला त्याचबरोबर 12 बँकिंग शेअर्स मिळून तयार झालेला बँक निफ्टी हा निर्देशांक तब्बल 474 एवढ्या अंकांनी वधारून 35673 या पातळीवर बंद झाला.

आजच्या सत्रात चौथे खरेदी बघायला मिळाली त्याच बरोबर स्मॉलकॅप मिडकॅप समभागांमध्ये सुद्धा काही प्रमाणात खरेदीचे संकेत दिसत होते. बाजार सध्या कभी खुशी कभी गम या अवस्थेतून जात आहे तज्ञांच्या मते निफ्टी जोपर्यंत 16000 क्रॉस करत नाही तोपर्यंत चांगल्या प्रकारे तेजीचे संकेत म्हणता येणार नाही त्यामुळे बाजार पुढील काळात सुद्धा अशाच प्रकारे चढ-उतार दाखवत राहील.

कमोडिटी बाजारांमध्ये गोल्ड सिल्वर चे दर वधारले तर कच्च्या तेलाच्या किमती सुद्धा वाढताना दिसत आहेत.बाजारामध्ये मागील काही दिवसांपासून रिटेल गुंतवणूकदारांचे प्रमाण वाढलेले आहे कारण कोविड काळामध्ये डिमॅट अकाउंट ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात उघडले आहेत त्याचाच परिणाम म्हणजे सी डी एस एल या संस्थेने असे घोषित केले आहे की त्यांच्याकडे चार करोड अकाउंट संख्या झालेली आहे.

बाजारातील तज्ञ सांगत आहेत की बाजार असतील राहण्याला कारण एक असेही असू शकते कारण बाजारामध्ये मोठे आयपीओ सध्या सुरू आहेत मागे क्लीन सायन या आयपीएल मध्ये देशभरातून एक लाख करोड इतकी रक्कम जमा झालेली आहे तर सध्या झोमॅटो हा आयपीएल गुंतवणूकदारांसाठी ओपन आहे.

या आठवड्यामध्ये बाजारातील दिग्गज कंपन्यांचे तिमाही निकाल घोषित होणार आहेत यावर सुद्धा बाजाराची पुढील दिशा काय असेल हे निश्चित होणार आहे.

NIFTY १५८१२ + १२०

SENSEX ५२७६९ + ३९७

BANK NIFTY ३५६७३ + ४७४

आज निफ्टी वधारलेला शेअर्स

ICICI BANK ६६४ + ३%

GRASIM १५७७ + ३%

HDFC २५४२ + ३%

AXIS BANK ७७१ + २%

SBI LIFE १०५५ + २%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

ADANIPORTS ७०४ – २%

DR.REDDY ५४४० – १%

HCLTECH ९७० – १%

TATACONSUM ७७१ – १%

TECHM १०५० – १%

यु एस डी आय एन आर $ ७४.६१५०

सोने १० ग्रॅम ४७८३०.००

चांदी १ किलो ६९१५०.००

क्रूड ऑईल ५५२०.००

Vishwanatha Bodade
विश्वनाथ बोदडे, नाशिक

संपर्क- 8888280555

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.