करवंदाचे आरोग्यास फायदे

0

डॉ.राहुल रमेश चौधरी 
जंगलची काळी मैना म्हणून करवंदे ओळखली जातात.करवंदाच्या जाळ्या डोंगरात दऱ्या-खोऱ्यात मुबलक स्वरूपात आढळतात.ही फळे सुरुवातीला हिरवे,थोडी टणक ,गोल असतात.ह्याची चव सुरुवातीला आंबट-तुरट असते पिकल्यानंतर मात्र गोड आंबट चवीची जांभळी रंगाची असतात.
 
उपयोग
 
१.आयुर्वेदात सप्तधातुंपैकी रस धातुस पोषण देणारे अशी ही करवंदे आहेत.
 
२.उन्हात अतिप्रमाणात काम करणे,आगीजवळ सतत काम करणे,सतत तहान लागणे,कितीही पाणी पिले तरी तहान न भागणे अश्या वेळी करवंदे व्यवस्थित चघळून खावी,बी टाकून द्यावी.
 
३.पोटात पित्तामुळे जळजळ होत असल्यास पिकलेली करवंदे खावी.
 
४.तोंडास चव नसणे,तोंड विरस होणे अश्या वेळी करवंदे बी सह चावून खावी.याने तोंडास चव येते.
 
५.गांधीलमाशी चावणे,किंवा एखादा किडा चावणे अश्या वेळी चावलेल्या ठिकाणी करवंदाचा रस चोळून लावावा.याने उत्तम फायदा होतो.
 
६.जागरण झाल्याने,थोडे उन्हात फिरल्याने नाकात घोळणा फुटतो व रक्त येते याची सवय असल्यास पिकलेली करवंदे खावी व बी थुंकावी.
 
७.अतिप्रमाणात मद्यपान करणे,खूप तिखट खाणे याने रक्तस्त्राव होत असल्यास पिकलेली करवंदे खावी.
 
८.विंचू चावल्यास,साप चावल्यास विषाचा अपाय झाल्यास मूळ दंश झालेल्या ठिकाणी लावावा व त्याची लक्षणे दिसल्यास मूळीचा रस नाकात सोडावा.
 
९.पोटात वायू पकडल्यास,दुखल्यास कच्ची करवंदे ,मूग कढण व दही एकत्र करून द्यावे.
 
१०.कच्ची करवंदे लोणची करण्याकरीता वापरावी,हे लोणचे भूक वाढवते,खाल्लेल्या अन्नात पाचक स्त्राव मिसळून त्याचे पाचन करते.
 
सावधान…!!
 
१.फळ खाताना बी काढून टाकावे,खाल्ल्यास जुलाब होवू शकतात.
 
२.अतिप्रमाणात करवंदे खावू नयेत
 
३.कच्ची करवंदे जास्त खावू नये खाल्ल्यास पोटात दाह,जळजळ होते.
 
४.करवंद आईस्क्रीम एकत्र खावू नये
 
५.कच्च्या करवंदाचा चिक काढून फळ खावे,अन्यथा घसा खवखवतो-खोकला येणे-जीभेस चरे पडणे संभवते.
Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी


मोबाईल -९०९६११५९३०

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.