शेअर बाजारात तेजी परतली

विश्वनाथ बोदडे,नाशिक

0

विश्वनाथ बोदडे,नाशिक

मागील पाच दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार बघायला मिळालेत याला मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व शेअरबाजार असते स्वरूपात दिसले त्याचप्रमाणे भारतीय शेअर बाजार उंच स्थरावर असल्यामुळे वरच्या स्तरावरून सेल ऑफ दिसला म्हणजेच काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा 30 सर्व भागांचा निर्देशांक सेन्सेक्स 198 धन्यवाद 58 664 या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी सुद्धा 86 अंकांनी वधारून 17 503 या पातळीवर बंद झाला त्याचप्रमाणे 12 बँकिंग शेअर मिळून तयार झालेला बँक निफ्टी 144 अंकांनी वधारून 37 273 या पातळीवर बंद झाला.

सकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजार नकारात्मक स्वरूपात होते सिंगापुर निफ्टी जवळपास 100 अंकांनी नकारात्मक होती त्याचाच आधार भारतीय शेअर बाजारात दिसला व सकाळी बाजार नाकारात्मक स्वरुपात उघडले परंतु हळूहळू बाजारामध्ये बँकिंग फायनान्स स्टील क्षेत्रांमध्ये काही प्रमाणात मागणी दिसली त्यामुळे मागील पाच दिवसांमध्ये जी पडझड चालू होती त्याला आज ब्रेक मिळाला.

भारतीय शेअर बाजारात सध्या सन 2000 मध्ये ज्याप्रमाणे डॉट कॉम कंपन्या आल्या होत्या त्याचप्रमाणे सध्या बाजारामध्ये आयपीओ च्या माध्यमातून ॲप बेस म्हणजेच स्टार्ट अप च्या माध्यमातून ज्या कंपन्या मागील तीन चार वर्षांमध्ये लॉन्च आलेले आहेत त्या कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात आय पी ओ येत आहेत याला चांगला प्रतिसाद भेटत असला तरीसुद्धा काही कंपन्यांनी लिस्टिंग च्या वेळेस गुंतवणूकदारांना नाराज केल्याचे दिसत आहे.

सध्या गुंतवणूकदार संभ्रम भूमिकेत दिसत आहे त्याला कारण म्हणजे बाजार उंच स्थरावर आहे सेन्सेक्स निफ्टी काही प्रमाणात करेक्शन दिसले आहे परंतु ह्या कलेक्शनमध्ये सेन्सेक्स निफ्टी जरी कमी खाली येत असलेले तरी मात्र शेअरचे भाव मोठ्या प्रमाणात खाली येताना दिसत आहे त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक चांगल्या प्रतीच्या शेअर्समध्ये करावी जेणेकरून बाजार वरती जाईल तेव्हा त्यांना परतावा सुद्धा चांगला मिळेल.

कमोडिटी बाजाराचा विचार केला तर सोने आणि चांदीच्या दरामध्ये चांगल्या प्रकारे चढ-उतार बघायला मिळत आहेत क्रूड ऑईलचे भाव सुद्धा वरच्या स्तरावरून काही प्रमाणात करेक्शन झालेले आहेत.

NIFTY १७५०३ + ८६
SENSEX ५८६६४ + १९८
BANK NIFTY ३७२७३ + १४४

आज निफ्टी वधारलेला शेअर्स

POWER GRID २०२ + ४%
JSW STEEL ६८३ + ४%
COAL INDIA १५७ + ४%
NTPC १३३ + ३%
ADANIPORTS ७३१ + २%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

ASIANPAINTS ३१७६ – ३%
INDUSINDBK ९८१ – ३%
INFY १७२७ – २%
AXIS BANK ६८४ – १%
TITAN २३८५ – १%

यु एस डी आई एन आर $ ७४.४३२५
सोने १० ग्रॅम ४७६९१.००
चांदी १ किलो ६३६२०.००
क्रूड ऑईल ५६५१.००

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.