सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम श्याम यांचे निधन

0

मुंबई – बॉलिवूड सह अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारे सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम श्याम यांचे निधन झालं ते ६३ वर्षांचे होते मुंबईतील एका खासगी हॉस्पिटल मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.गेल्या अनेक दिवसांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. गेल्या चार दिवसापूर्वी त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते.मल्टिपल ऑर्गन फेलिअरमुळे त्यांचं निधन झालं.अशोक पंडित यांनी ट्विटर वरून त्यांच्या निधनाची बातमी दिली.

अनुपम श्याम यांनी क्योंकि… जीना इसी का नाम है, अमरावती की कथाये, हम ने ली है शपथ आणि डोली अरमानों की सारख्या अन्य लोकप्रिय शो मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्यात. त्यांनी परजानिया, बॅंडिट क्वीन, लगान, दिल से, नायक: द रियल हीरो और ऑस्कर विजेता फिल्म स्लमडॉग मिलियनेयर सारख्या बॉलिवूड चित्रपटात काम केले होते. याशिवाय त्यांनी ‘रिश्ते’, ‘डोली अरमानों की’, ‘कृष्णा चली लंडन’ आणि ‘हम ने ली शपथ’ सारख्या टीव्ही मालिकांमधून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

सकाळी ११.३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.