स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त जनस्थान सेवा मंडळातर्फे रांगोळी प्रदर्शन

0

नाशिक,दि,२५ मे २०२३ –स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त इंदिरानगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात शनिवार दि.२७ व रविवार दि.२८ मे रोजी सकाळी १० ते रात्रौ ९ वाजेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित रांगोळी प्रदर्शन होणार असून आंतरराष्ट्रीय रांगोळी कलाकार रश्मी विसपुते-दाभाडे(वंडर बुक ऑफ रेकॉर्ड,लंडन) या रांगोळ्या साकारणार आहेत.

सावरकरांच्या जीवनावर आधारित नाशकातील पहिले रांगोळी प्रदर्शन असून नागरिकांना प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी असे आवाहन जनस्थान सेवा मंडळाच्या वतीने माजी नगरसेवक ॲड.अजिंक्य विजय साने यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!