आजचे राशिभविष्य मंगळवार,३ ऑक्टोबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
भाद्रपद कृष्ण पंचमी. वर्षा  ऋतू.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज संध्याकाळी ६.०० नंतर चांगला दिवस” 
नक्षत्र – कृतिका. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  धन धान्य अबी विपुलता लाभेल. आप्त मदत करतील. शब्द जपून द्या.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मान सन्मान मिळतील. दबदबा वाढेल. शेअर्स मधून लाभ होतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. काही चांगले अनुभव येतील. नोकरीत काही कटकटी संभवतात.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) धनलाभाचा दिवस आहे. चांगले अनुभव येतील. काही विषय गांभीर्याने घ्याल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) धैर्य वाढेल. यश मिळेल. नोरी/ व्यवसायात प्रगती साधाल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)  जबरदस्त आत्मविश्वास वाढेल. प्रतिष्ठा मिळेल. व्यक्तिमत्व उजळून निघेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. फारशी अनुकूलता नाही. सावकाश प्रगती करा. संयम बाळगा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल रवी- चंद्र योग आनंद आणि समाधान देईन.राजकीय क्षेत्रात यश लाभेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक दृष्टीने अनुकूल दिवस आहे.नोकरीत वरिष्ठ खुश राहतील. सरकारी कामे होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) जेष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील.संपन्नता अनुभवास येईल.संतती कडून खुश खबर मिळेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक बाबतीत चांगला दिवस आहे.वाहन योग येईल. प्रतिष्ठा सांभाळावी लागेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक आवक चांगली राहील.व्यवसायात स्पर्धा जाणवेल.विरोधकांना उत्तर देऊ नका.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!