अखेर महायुतीच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती ? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी बघा 

0

मुंबई,दि,२१ डिसेंबर २०२४ –अखेर महायुती मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. मंत्रिमंडळाच्या शपथविधीला एक आठवडा उलटला तरी अद्याप खातेवाटप झाले नव्हते. मंत्रिमंडळाचे खातेवाटप नेमके कधी जाहीर होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असतानाच अखेर महायुतीचे खातेवाटप जाहीर झाले आहे. त्यामध्ये, अखेर गृह मंत्रालय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहिले आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ही महत्त्वाची खाती देण्यात आली आहे.   .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी (दि. १५ डिसेंबर ) ला पार पडला.यामध्ये ३३ कॅबिनेट तर ६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहेत. भाजपमधील १९, शिंदेंच्या शिवसेनेतील ११ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी निवासस्थानी मोठ्या घडामोडी दिसून आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदार चहापानासाठी पोहोचले होते. यामुळे खातेवाटप आजच जाहीर होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच महायुतीच्या काही आमदारांनी खातेवाटप आजच जाहीर होणार असल्याचे सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे खातेवाटप नेमके कधी जाहीर होणार? याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र आता प्रतीक्षा संपली असून महायुतीचे खातेवाटप जाहीर झाले आहे.

महायुतीचे खातेवाटप पुढील प्रमाणे 
1चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
7.गणेश नाईक – वन
8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण
9.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
10.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय
16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे – महिला व बालविकास
21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
22.माणिकराव कोकाटे – कृषी
23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे – कापड
26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय
27.प्रताप सरनाईक – वाहतूक
28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
31.आकाश फुंडकर – कामगार
32.बाबासाहेब पाटील – सहकार
33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्री (State Ministers )
माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
योगेश कदम – गृहराज्य शहर
पंकज भोयर – गृहनिर्माण,

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.