आजचे राशिभविष्य गुरुवार,४ जून २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अधिक ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी. ग्रीष्म ऋतू.पराभव नाम संवत्सर.
शके १९४८, संवत २०८२.  
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००  
“आज शुभ दिवस आहे.”  
चंद्र नक्षत्र – उत्तराषाढा.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु / सकाळी ७.४२ नंतर मकर.  
चंद्र प्रतियुती गुरू.  
चंद्र त्रिकोण हर्षल.  
चंद्र लाभ नेपच्यून.

राशिभविष्य (Marathi Rashi Bhavishya)

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) भाग्याची उत्तम साथ लाभेल. नवीन योजना यशस्वी होतील. चंद्र-हर्षल योगामुळे अचानक लाभाची संधी मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. प्रवासातून लाभ संभवतो.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अनपेक्षित खर्च संभवतो. मात्र नेपच्यूनच्या अनुकूल प्रभावामुळे नवीन कल्पनांचा फायदा होईल. कुटुंबातील वातावरण चांगले राहील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. सामाजिक संपर्क वाढतील.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) कामाचा ताण वाढू शकतो. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्याची काळजी घ्या. संयमाने वागल्यास दिवस लाभदायक ठरेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) पंचमस्थानी चंद्राचा प्रभाव शुभ आहे. संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी होतील. सर्जनशील कार्यात विशेष यश मिळेल. विद्यार्थ्यांना लाभदायक दिवस.

कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) घरगुती वातावरण आनंददायक राहील. वास्तू, वाहन किंवा मालमत्तेसंबंधी विषयात प्रगती होईल. आईचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती सुधारेल. मानसिक समाधान मिळेल.

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. लहान प्रवासाचे योग संभवतात. नवीन व्यवहार फायदेशीर ठरतील. तुमच्या कल्पना इतरांना प्रभावित करतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) आर्थिक लाभाचा दिवस आहे. बोलण्याच्या कौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. कुटुंबीयांसोबत आनंददायी वेळ जाईल. नवीन खरेदीचा योग संभवतो. गुंतवणुकीतून लाभ मिळेल.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सकाळपर्यंत राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे सकाळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नंतर संयमाने वागा. नवीन संधींचा लाभ घेता येईल.

मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) सकाळनंतर चंद्र राशीत प्रवेश करणार असल्याने उत्साह वाढेल. मन प्रसन्न राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) खर्च वाढण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. आर्थिक नियोजन आवश्यक आहे.

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) लाभस्थानी चंद्र असल्याने आर्थिक आवक वाढेल. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.“राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521) 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!