आजचे राशिभविष्य गुरुवार,२५ जून २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
निज ज्येष्ठ शुक्ल एकादशी / रात्री ८.१० नंतर द्वादशी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
⏰ राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
✨ “संध्याकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस आहे.” *आज निर्जला एकादशी*
🌙 चंद्र नक्षत्र – स्वाती / दुपारी ४.२९ नंतर विशाखा.
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ. सकाळी ७.०९ ते रात्री ८.१० विष्टी करण)
🔭 रवी केंद्र नेपच्यून.
🔭 चंद्र केंद्र शुक्र.
🔭 शुक्र त्रिकोण शनी.
🪔 राशिभविष्य (Marathi Rashi Bhavishya)

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) भागीदारीच्या कामात यश मिळेल. चंद्र-शुक्र योगामुळे संबंधांमध्ये गोडवा वाढेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे व्यवहार संध्याकाळपूर्वी पूर्ण करावेत.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) कामाचा ताण वाढू शकतो, परंतु मेहनतीचे चांगले फळ मिळेल. शुक्र-शनी योगामुळे नियोजनबद्ध कामांना यश मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) विद्यार्थी आणि सर्जनशील क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस आहे. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी होतील. नवीन कल्पना यशस्वी ठरतील.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) घरगुती वातावरण आनंददायी राहील. मालमत्तेसंबंधी विषयात प्रगती होईल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. मानसिक समाधान मिळेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. संवादकौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. लहान प्रवास लाभदायक ठरतील.

कन्या:– (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) आर्थिक लाभाचे संकेत आहेत. बोलण्यातील प्रभावामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. नवीन खरेदीचा योग संभवतो.

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. नवीन योजना आणि उपक्रम यशस्वी ठरतील. समाजात मान-सन्मान वाढेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) खर्च वाढण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. काही गोष्टींमध्ये संयम राखणे आवश्यक राहील. गुप्त लाभाची शक्यता आहे.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांची कृपा लाभेल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आर्थिक स्थिती सुधारेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) भाग्याची उत्तम साथ लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. नवीन संपर्क लाभदायक ठरतील.

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अचानक खर्च संभवतो. संशोधन व तांत्रिक क्षेत्रात यश मिळेल. मानसिक स्थैर्य राखल्यास दिवस समाधानकारक जाईल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!