
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
कार्तिक शुक्ल प्रतिपदा / दुपारी २.०१ नंतर द्वितीया. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.
चंद्र नक्षत्र – विशाखा / सकाळी ९.१९ नंतर अनुराधा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक.
ग्रहयोग – चंद्र प्रतियुती हर्षल, चंद्र त्रिकोण नेपच्यून, शुक्र लाभ मंगळ.
आजचा दिवस – शुभ दिवस आहे. चंद्र प्रतियुती हर्षल योगामुळे काही अनपेक्षित घटना आणि नवीन संधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बदलत्या परिस्थितीचा योग्य उपयोग करून घ्या. चंद्र त्रिकोण नेपच्यून योगामुळे कल्पनाशक्ती आणि अंतर्ज्ञानाला चालना मिळेल. शुक्र लाभ मंगळ योगामुळे आर्थिक लाभ, प्रेमसंबंध आणि व्यावसायिक क्षेत्रात अनुकूलता राहील. नवीन कामे सुरू करण्यासाठी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला आहे.
राशिभविष्य (Marathi Rashi Bhavishya)
मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. अचानक एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) भागीदारीच्या व्यवसायात चांगला लाभ होईल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. नवीन करार करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. शत्रूंवर मात करण्यात यश मिळेल.
कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. प्रेमसंबंधात अनुकूलता राहील. कला आणि सर्जनशील क्षेत्रात चांगले यश मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. घर आणि मालमत्तेच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन संधी उपलब्ध होतील. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. घरातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) तुमच्या पराक्रमात आणि कार्यक्षमतेत वाढ होईल. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. नवीन लोकांशी संपर्क फायदेशीर ठरेल. तुमच्या बोलण्यामुळे महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
तूळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. नोकरी-व्यवसायात अनुकूलता राहील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. चंद्र प्रतियुती हर्षल योगामुळे अनपेक्षित संधी मिळू शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, निर्णय घेताना संयम ठेवा.
धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. परदेशाशी संबंधित कामात प्रगती होईल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमवाल. प्रवासाचे योग संभवतात. महत्त्वाची कामे गुप्तपणे आणि नियोजनपूर्वक करा.
मकर:– (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल दिवस आहे. वरिष्ठांकडून सहकार्य आणि कौतुक मिळेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. महत्त्वाची कामे यशस्वी होतील.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. दूरच्या प्रवासाचे योग येतील. नवीन कामात यश मिळण्याची शक्यता आहे.आर्थिक व्यवहारात विशेष काळजी घ्यावी. अचानक खर्च उद्भवू शकतात. वारसा हक्काच्या किंवा मालमत्तेच्या संदर्भात चर्चा होईल. जोडीदाराशी संवाद साधताना संयम ठेवा.आरोग्याची काळजी घ्या.
(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.“राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
