शेअर बाजारात अस्थिरता कायम ! सेन्सेक्स २९५ अंकांनी वधारला

विश्वनाथ  बोदडे,नाशिक 

0

विश्वनाथ  बोदडे,नाशिक 
88 88 280 555

भारतीय शेअर बाजार सध्या आपली स्पष्ट दिशा दाखवताना दिसत नाही. त्याला मुख्य कारण म्हणजे नवीन विषाणू मुळे जगभरात वाढत असलेली संख्या त्याच बरोबर काही राज्यांनी सुरू केलेली नवीन नियमावली त्याचबरोबर वरच्या स्तरावर बाजारामध्ये प्रत्येक दिवसाला येत असलेली सेलींग त्यामुळे बाजारांमध्ये सध्या प्रेशर दिसत आहे परंतु बाजाराला खरी दिशा ही पुढच्या नवीन वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळेल कारण देशामध्ये सरकारच्या माध्यमातून कशा प्रकारे या नवीन विषाणूला आळा घालू शकतील त्याचबरोबर काही राज्यात मध्ये असलेल्या निवडणुका व मुख्य म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये काय नवीन घोषणा येतात यावर बाजाराची दिशा अवलंबून राहणार आहे.

आजच्या शेअर बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील शक्यता च्या आधारे सकाळी शेअर बाजार नकारात्मक उघडला की नकारात्मकता  हळूहळू सकारात्मक मध्ये आली, कारण खालच्या स्तरावर आयटी फार्मा त्याचबरोबर चांगल्या प्रतीच्या मिडकॅप व स्मॉल कॅप सहभागामध्ये  चांगली मागणी बघायला मिळाली परंतु वरच्या स्तरावर इतर क्षेत्रात  समभगांमध्ये काही प्रमाणात विक्री सुद्धा बघायला मिळत होती.

सध्या बाजारामध्ये काही कारणामुळे भीतीचे वातावरण आहे त्यामध्ये मुख्य कारण म्हणजे वाढत्या विषाणूंचे प्रमाण विदेशी वित्तीय संस्था कडून होत असलेली विक्री, त्याच बरोबर महागाई दर वाढू शकतो ,असे काही संकेत मिळत आहेत यामुळे बाजारातील गुंतवणूकदार सावध पवित्र्यात दिसत आहेत,जर गुंतवणूकदारांना गुंतवणूक करायची असेल तर त्यांनी लांब वधीसाठी विचार करावा व विविध क्षेत्रांचा समभगांमध्ये आपली गुंतवणूक विभाजित करून चांगल्या सल्लागाराच्या मार्फत  करायला पाहिजे.

सामान्य गुंतवणूक दारासाठी सल्ला

गुंतवणूकदारांनी हे समजून घ्यावे की पैसा आपला आहे आणि आपण जर गुंतवणूक करत असाल तर शेअर बाजारामधून गुंतवणूक करत असताना नफा आणि फायदा या दोन्ही गोष्टी आपल्याला स्वीकारावे लागतात त्याच बरोबर काही कालावधीमध्ये जर नफा मिळत असेल तर तो नफा आपल्या खिशात ठेवावा परंतु ज्या समभागांमध्ये लांब अवधीसाठी नफा मिळेल असेच संकेत असतील तर असे समभाग आपल्या पोट खोलीमध्ये आपल्या आर्थिक सल्लागार यांच्या मार्फत सल्ला घेऊन निश्चितच असे समभाग आपल्या होल्डिंग मध्ये निश्चित ठेवावे त्याचबरोबर आपली गुंतवणूक करण्याआधी आपला हेल्थ इन्शुरन्स आणि इन्शुरन्स काढून ठेवावा हे उपयुक्त राहील.

NIFTY १७०६८ + ८२
SENSEX ५७४२० + २९५
BANK NIFTY ३५०५७ + २००

आज निफ्टी वधारलेला शेअर्स 

TECHM १७८३ + ३%
CIPLA ९२९ + २%
DR.REDDY ४७३४ + २%
UPL ७६० + २%
KOTAK BANK १७७३ + २%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

HINDALCO ४५२ – १%
BRITANNIA ३५०९ – १%
ONGC १३७ – १%
INDUSNDBK ८५६ – १%
MARUTI ७२८० – १%

यु एस डी  आई एन आर $ ७५.०७२५
सोने १० ग्रॅम          ४७९४०.००
चांदी १ किलो        ६२१४०.००
क्रूड ऑईल            ५४८३.००

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.