नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ : दिवसभरात ५०८ नवे रुग्ण

नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

0

मागील २४ तासात : नाशिक शहरात ४१३ नवे रुग्ण : सद्य स्थितीत १४६१ ऍक्टिव्ह रुग्ण ८८ जण कोरोना मुक्त : ३२ कोरोनाचे संशयित : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५४%

नाशिक  गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णामध्ये झपाट्याने वाढ होतांना दिसत आहे.आज  नाशिक जिल्ह्यात एकूण ५०८ कोरोना बाधित रुग्ण आढळले.त्यापैकी नाशिक शहरात नव्या रुग्णांची संख्या ४१३

 झाली तर जिल्ह्यात आज ८८ जण कोरोना मुक्त असून आज जिल्ह्यात कोरोनामुळे आज २ जणांचा मृत्यू झाला.आज २२९४ जणांचे कोरोनाचे अहवाल येणे प्रतीक्षेत आहे.

 
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९७.५४ % झाली आहे.आज जवळपास ३२ संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज  २ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात ०२ जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात ०० ,मालेगाव महापालिका हद्दीत ० रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
 
नाशिक शहरात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  ९८.५४ % झाली आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण १४६१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ११२९ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  –

नाशिक ग्रामीण मधे ९७.१४ %,नाशिक शहरात ९७.८० %, मालेगाव मध्ये ९७.०९ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.२१ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.५४ %इतके आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:-२

नाशिक महानगरपालिका- ००

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०२

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ८७६१

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ४०२९

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०७:००वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०१

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – २२

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०१

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ०२

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०६

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – २२९४


नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.