मुंबई – संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंळाचा विस्तार उद्या होणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.उद्या सकाळी ११ वाजता राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळतेय. राजभवनावर शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचंही कळतंय. दोन टप्प्यात हा विस्तार होण्याची माहिती समोर येत आहे. पहिल्या टप्प्यात १८ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन एक महिना पूर्ण झाले. पण अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू होते.दरम्यान, या दोन दिवसात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. आता जास्त काळ वाट पाहिला लागणार नाही, असं रामदास कदम यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. पहिल्या टप्प्यात किती मंत्र्यांचा समावेश असेल हा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा असेल, असंही रामदास कदम यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच मंत्रिमंडळात माझा समावेश नसेल असंही रामदास कदम यांनी सांगितलं आहे.
शिंदे गटातील संभाव्य मंत्री – दादा भुसे,गुलाबराव पाटील,दिपक केसरकर,उदय सामंत ,अब्दुल सत्तार,संजय राठोड ,शंभुराज देसाई,संदिपान भुमरे.तानाजी सावंत ,
भाजपचे संभाव्य मंत्री – चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील ,मंगलप्रभात लोढा ,रविंद्र चव्हाण ,सुरेश खाडे ,अतुल सावे,विजयकुमार गावित