बाबाज थिएटर्स तर्फे नाशिककरांसाठी शनिवारी ‘स्वर मंगेश’ संगीत मैफल

0

नाशिक,२८ सप्टेंबर २०२२- येथील सांस्कृतिक क्षेत्रातील परिचित बाबाज‌् थिएटर्सच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (दि. १) क्षितिज प्रस्तुत ‘स्वर-मंगेश’ हा मराठी-हिंदी गीतांच्या अनोख्या संगीत मैफलीचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे.

प. सा. नाट्यमंदिर येथे सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या ‘स्वर-मंगेश’ कार्यक्रमात येथील गायिका विद्या कुलकर्णी, मुग्धा कुलकर्णी, क्षितिजा कुलकर्णी, अभिषेक नलावडे (मुंबई) हे मंगेशकर भावंडांनी गायलेली अमोघ विविधरंगी नावाजलेली हिंदी-मराठी गीते सादर करणार आहेत. त्यांना अनिल धुमाळ, प्रणव हरिदास (मुंबई), राजू भालेराव, आदित्य कुलकर्णी, महेश कुलकर्णी, यश यंदे, प्रणव कोंटुटवार हे संगीतसाथ करणार आहेत. निवेदन मुंबई येथील धनश्री दामले करणार आहेत.

संगीतदर्दी व ज्येेष्ठ नागरिकांकरिता होणाऱ्या या कार्यक्रमात बाबाज‌् थिएटर्सच्या वतीने प्रशांत महाबळ (संगीत), मंदार देशमुख (सामाजिक, क्रीडा) व नाट्यरंग कर्मी ईश्वर जगताप तसेच मविप्रचे नूतन सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांचा सत्कार करण्यात येणार असून, या संगीत मेजवानीचा रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन बाबाज‌् थिएटर्सचे प्रशांत जुन्नरे, प्रा. प्रीतिश कुलकर्णी, श्यामराव केदार, जे. पी. जाधव, मामा तांबे, एन.सी. देशपांडे, दिलीपसिंग पाटील, सुधीर कुलकर्णी आदींनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!