Bigg Boss Marathi -3 ,नवा आठवडा, नवा टास्क – जोडी की बेडी !

0

मुंबई – नुकतीच बिग बॉसची पहिली चावडी रंगली. महेश मांजरेकरांनी काही सदस्यांची कानघडणी केली, काहींना शाबासकी मिळाली. मीराला, गायत्रीला त्या कुठे चुकत आहेत हे सांगितले. काही सदस्य घरामध्ये दिसत नसून त्यांनी सुरू होणार्‍या आठवड्यात त्यांचे मत मांडावे असे सांगितले. आता सुरू झाला आहे नवा आठवडा… नव्या आठवड्यामध्ये रंगणार नवा टास्क.

“जोडी की बडी” या आठवड्याची थीम असून, या थीमच्या अंतर्गत नवा टास्क रंगणार आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये दिसते आहे, बिग बॉस यांनी बिग बॉस मराठीच्या घरात एकटं फिरण्यास सदस्यांना बंदी केली आहे. इथून पुढे संपूर्ण आठवडाभर नेमून दिलेल्या जोडीदारासोबतच पूर्ण वेळ सदस्यांना खेळ खेळावा लागणार आहे असं बिग बॉस यांनी जाहीर केले. आणि हे ऐकताच सदस्यांचे चेहरे पडले. आता या जोड्या कोणत्या असणार ? या टास्कमध्ये नक्की काय घडणार ? हे कळणार आहे आजच्या भागामध्ये.

शनि – रवीमध्ये पार पडलेल्या बिग बॉसच्या चावडी मध्ये Best मालकीण स्नेहा वाघ ठरली, तर Worst मालकीण ठरली शिवलीला आणि Best सेवक ठरला विशाल आणि Worst सेवक ठरला आविष्कार. याचसोबत उत्कर्ष टीम आणि दादुस टीम यांच्यामध्ये जुगलबंदी देखील रंगली. स्नेहा, आविष्कार, सुरेखा कुडची, तृप्ती, मीनल शाह आणि जय यांनी काही सदस्यांना त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगितल्या. तर विशाल, विकास, उत्कर्ष आणि सुरेखा कुडची यांना वूट चुगली तर्फे त्यांच्या चाहत्यांनी पाठवलेली चुगली ऐकवली. या आठवड्यात कोणाचा आवाज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये घुमणार ? कोण गाजवणार हा आठवडा ? कोण नॉमिनेशनमध्ये जाणार ? कोण होणार सेफ ? बिग बॉस मराठी दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.