बॉलीकॉईनचा एनएफटी बाजारात प्रवेश

0

मुंबई– बॉलीवूडमधील अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक अतुल अग्निहोत्री यांनी सुरु केलेला प्लॅटफॉर्म बॉलीकॉईनने एनएफटी बाजारात प्रवेश केला आहे. हा प्लॅटफॉर्म चित्रपट रसिकांना चित्रपटांतील क्लिप्स आणि छायाचित्रे, अजरामर संवाद, पोस्टर्स, अप्रदर्शित फुटेज तसेच सोशल मीडिया कन्टेन्ट आणि सेलिब्रिटीजच्या मर्चंडाइजमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देणार आहे. सलमान खान या प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी होणारे पहिले बॉलीवूड सुपरस्टार ठरले आहेत. चाहत्यांना त्यांच्या स्टॅटिक एनएफटी’ज खरेदी करता येणार आहेत.

युजर्सना बॉलीकॉईनडॉटकॉम (BollyCoin.com) च्या अधिकृत वेबसाइटवरून एनएफटी’जची खरेदी करता येणार आहे. येथे आधीच खरेदीसाठी बॉलीकॉइन टोकन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या प्लॅटफॉर्मने सलमान खान, फिल्म्स, अरबाज खान प्रोडक्शन, सोहेल खान प्रोडक्शन आणि रील लाइफ प्रोडक्शनसोबत भागीदारी केली आहे. येत्या डिसेंबरमध्ये बाजारपेठ प्लॅटफॉर्म म्हणून लाँच होण्याआधीच विविध अग्रगण्य निर्मिती संस्थांशीही भागीदारी करण्यात येणार आहे.

जगातील सर्वात मोठी बॉलीवूड केंद्रीत एनएफटी बाजारपेठ होण्याच्या असामान्य ध्येयाने बॉलीकॉइनची स्थापना करण्यात आली होती. उल्लेखनीय म्हणजे, या बाजारपेठेत जेव्हाही एनएफटी विकली जाईल तेव्हा बॉलीकॉइन असलेल्या ग्राहकांना बॉलीक्रेडिट्सचे बक्षीस मिळणार आहे. युजर्सना या क्रेडिट्सचा उपयोग एनएफटीज’खरेदी करण्यासाठी करता येईल. युजर्ससाठी मनोरंजनाचा आनंद, गुंतवणूक आणि परताव्याचे हे चक्र सुरूच राहील.

बॉलीकॉइनचे सह-संस्थापक अतुल अग्निहोत्री म्हणाले की, “ आपण जेव्हा-केव्हा ब्लॉकचेन किंवा गुंतवणुकीचा विषय काढतो तेव्हा आपल्याला काहिशी अनिश्चितता जाणवते. कारण आपल्यापैकी बहुतेक लोकांना स्टॉक्स, क्रिप्टोकरन्सीज किंवा इतर कोणत्याही प्रकारातील डिजिटल चलनांची फार काही माहिती नसते. आपल्याला बॉलीवूडच्या प्रसिद्ध चित्रपटांतील संवाद, गाणी अन् लोकप्रिय नृत्यगीतांच्या अगदी स्टेप्सही माहीत असतात. बॉलीकाइनच्या माध्यमातून आम्ही सृजनात्मक मनोरंजन आणि गुंतवणूक, एनएफटी’ज, डिजिटल मालमत्ता यांच्यात सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला आहे. सलमान खान स्टॅटिक एनएफटीजसाठी आमच्यासोबत सलमान खान यांनी भागीदारी केल्यामुळे आम्ही अत्यंत आनंदी आहोत. आम्ही योग्य मार्गावर असल्याचे त्यातून इंगित होत आहे.”

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.