तोंडलीचे आरोग्यास फायदे 

0
डॉ.राहुल रमेश चौधरी 
वेगवेगळ्या काव्यसंग्रहात नाजूक ओठांना पिकलेल्या तोंडल्यांची उपमा दिलेली आहे.अर्थातच ते यथार्थ ही आहे.पिकलेली तोंडली ही लाल चुटूक असतात तर कच्ची ही हिरवी असतात.तोंडल्याची वेल असते.औषधासाठी मात्र याचे सर्वच अंग वापरले जातात(पान,फूल,फळ,मूळ,देठ).असे म्हणतात की याचे मूळ व फळ हे बुध्दी कमी करणारे असते त्यामुळे त्याचे सेवन कमी ठेवावे.
 
ही भाजी बुध्दीला जडत्व आणनारी असल्याने आरोग्यास एवढी लाभदायी समजली जात नाही.हे दोन प्रकारचे असतात कडू व गोड.त्यापैकी गोड असणारे आहारात असावे.पंजाब,उत्तरप्रदेश,राजस्थान येथे उन्हाळी भाज्यांमध्ये तोंडली प्रसिध्द.गुजरात मध्ये यास घिलोडा,सौराष्ट्रात टींडोळा,गुजराती खेड्यांमध्ये धोला म्हणतात.
 
काय आहेत तोंडलीचे आरोग्यास फायदे !
 
१.कडू तोंडल्याच्या पाल्याचा रस विंचवाच्या दंशावर गुणकारी असतो.
 
२.तोंडल्याच्या पाल्याचा रस व पांनाचे पोटीस बांधल्यास गळू ची वेदना कमी होते.व गळू पिकून फुटते.तसेच दुखणाऱ्या जखमेवर पानांचा रस काढून लावल्यास दुखणे कमी होते.
 
३.मासिक पाळीच्या वेळी अतिप्रमाणात होणाऱ्या रक्तस्त्रावावर तोंडल्याचे मूळ गुणकारी ठरते.
 
४.कडू तोंडल्याचा मधुमेहात चांगला उपयोग होतो.
 
५.या भाजीच्या जातीतील इतर फळभाज्यांपेक्षा या भाजीचे पोषण मूल्य अल्प असते.
 
६.कावीळ झाल्यास बिन तेल व मसाल्याची कोवळ्या तोंडल्याची भाजी पथ्यकर असते.
 
७.मार लागणे,मुरगळणे,सूज येणे अश्या ठिकाणी कडू तोंडली व हळद एकत्र करून हिंग मीठ टाकून पोटीस करून बांधल्यास उपयोग होतो.
 
८.तोंडाला चव नसणे,जीभेवर पांढरा साका जमा होणे यात कच्ची तोंडली व मीठ हे मिश्रण चावून बारिक करून थुंकल्यास मुखशुध्दी होते.अन्नाची चव लागते.
 
९.कडू तोंडली पाण्यात उकळून व ते पाणी लहान मुलांना मीठ मध घालून पाजल्यास सर्व कफ उलटी होवून पडतो.
 
१०.अम्लपिताच्या रुग्णांत कोवळ्या तोंडल्याची भाजी पथ्यकर असते.
 
११.स्तनपान करताना स्त्रीस स्तन्य कमी सुटत असेल.तर स्त्रीने उकडून केलेली भाजी खाण्यात ठेवावी.याने उत्तम लाभ होतो.
 
१२.कमी बांधून सतत जुलाब होत असल्यास व जुलाब हे आतड्यांची शक्ती मुख्यत: मोठ्या आतड्याची शक्ती कमी असल्यास तोंडल्याची भाजी उत्तम काम करते.तोंडली उकडताना त्यात मीठ,हिंग,आले,लसून,जीरे,कोथिंबीर टाकावे.गव्हाच्या फुलक्यांना तूप लावून खावे व शुंठ टाकून उकळलेले पाणी प्यावे.
 
१३.खोकला व दमा असल्यास तोंडली बारीक कापून ४ ग्लास पाण्यात उकळवून १ ग्लास पाणी शिल्लक ठेवावे त्यात भाजका ओवा,हळद,मिरे टाकून प्यावे .
 
१४.मधुमेहात होणारी जळजळ कमी करण्याकरीता तोंडल्याची भाजी हळदीची फोडणी देवून खावी.
 
१५,तोंडली थंड,पचण्यास जड आहेत.पण रक्तपित्त व रक्त पित्त दोष दूर करणारे आहेत.लघवीला धरून ठेवणारी,तोंडाला चव आणणारी.जखमा भरून काढणारी आहेत.
 
निषेध
 
१.पाने व मुळ याचा वापर सल्ल्याशिवाय करू नये.
 
२.मूळ हे अतिप्रमाणात उलट्या करवतात.
 
३.पोटात गॅस होणे,मलाचे खडे होणे असे असल्यास तोंडली खाणे टाळावे.
Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी
औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र   

संपर्क-९०९६११५९३०

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.