इटालियन ब्युटी जॉर्जिया एंड्रियानीचे नाव आता सर्वांच्या मनात कोरले आहे, बी टाऊन ब्युटी जॉर्जिया एंड्रियाच्या मोहक सौंदर्या बरोबरच ती खूप टॅलेंटेड सुद्धा आहे, तिचे डान्स आणि वर्कआउट व्हिडिओसला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानी नवीन भाषाही अगदीच सहजपणे शिकू शकते. जॉर्जिया ने या आधी हिंदी आणि पंजाबी भाषेवर आपले प्रभुत्व मिळविले आहे आणि आता मराठी भाषा मध्ये आपला एक विडिओ पोस्ट केला त्या मुळे तिच्या चाहत्यांना प्रचंड आश्चर्य वाटले आहे.
ज्योर्जिया एंड्रियानी मुळची इटलीची आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे पण नवीन गोष्टी शिकणे जॉर्जियाला खूप आवडते. अभिनेत्रींने आपल्या इंस्टाग्रामवर स्टोरी वर व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तिची मैत्रिणीने म्हणाली, “मी तुझी मराठीची परीक्षा घेणार आहे, ज्याला ज्योर्जियाने एक हास्यास्पद व्हिडीओ बनवून उत्तर दिले, “माझी परीक्षा काय घेशील, मी अगोदरच पास झाली आहे”. असे जॉर्जियाने उत्तर दिले
कार्यक्षेत्रात, जॉर्जिया अँड्रियानीने दक्षिणेत “करोलिन आणि कामाक्षी” या वेब सिरीयस मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानी २०२० मध्ये मिका सिंगबरोबर त्याच्या संगीत अल्बम “रूप तेरा मस्ताना” ह्या जिण्याने आपल्या नृत्य आणि लावण्या रूपाने सर्वांना चकित केले. ती लवकरच श्रेयस तळपदे यांच्यासमवेत “वेलकम टू बजरंगपूर” चित्रपटात दिसणार आहे. जॉर्जिया अँड्रियानीकडे अधिक उत्साही आगामी प्रकल्प आहेत ज्या ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.