लिव्हप्युअरचे स्मार्ट होम अप्लायन्सेस लॉन्च 

0

मुंबई – वॉटर प्युरिफायर्स, एअर कंडिशनर आणि स्लीप आणि वेलनेस सोल्युशन्सच्या नाविन्यपूर्ण उत्पादनातील अग्रगण्य ‘लिव्हप्युअर’ने नुकतीच नवीन उत्पादन श्रेणी लॉन्च केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्या ग्राहकांचे जीवन सुलभ करण्यासाठी आणि त्यात बदल करण्यासाठी या ब्रँडने एसीपासून वॉटर प्युरिफायर्सपर्यंत अनेक स्मार्ट घरगुती उपकरणे बाजारात लॉन्च केली आहेत.

लिव्हप्युअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रितेश तलवार म्हणाले, “लिव्हप्युअरमध्येआम्ही हे जाणतो की, आमचे ग्राहक पूर्वीपेक्षा जास्त वेळ घरी घालवत आहेत. त्यांच्या दैनंदिन वाढत्या गरजा लक्षात घेऊन आम्ही सुपर-स्मार्ट तंत्रज्ञानाधारित घरगुती उपकरण बाजारात लॉन्च केली  आहे. हे तंत्रज्ञान दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी सहजसोप्या करेल. घरामध्येच आरामदायी दिवस घालवता येईल सोबत पिण्याचे गरम पाणी ही मिळेल. आम्हाला विश्वास आहे की, ही उत्पादने आमच्या ग्राहकांच्या जीवनशैलीत भर घालतील, आणि प्रत्येक दिवस अधिक सुविधाजनक देखील करतील.”

स्प्लिट एसी १.५ टी विथ स्मार्ट इन्व्हर्टर: हेका या स्मार्ट परिणामकारक तंत्रज्ञानासह लिव्हप्युअरने ५ स्टार रेटिंगचा एसी तयार केला आहे, जो तुमच्या गरजेनुसार तीन मोडमध्ये थंडपणाची अनुभूती देईल. हेका मोड ऊर्जेच्या योग्य वापरासह aआराम देईल. मॅजिक मोड समाधान मिळवून देईल तर ग्रीन मोड ऊर्जा कार्यक्षमता सुनिश्चित करेल. या अद्ययावत वैशिष्ट्यांसह आपण आपल्या बिलावर ४०% पर्यंत वीज बचत करू शकता. ॲमेझॉन अलेक्सा आणि गुगल होमच्या माध्यमातून वापरकर्त्यांना त्यांच्या एसीवर सहजपणे नियंत्रण ठेवता येते. विशेष म्हणजे बिघाड झाल्यास हे स्वतःच निदान करुन त्याची वापरकर्त्यांना सूचना ही देते. जिओफेन्सिंगच्या मदतीने हा एसी तुमच्या फोनच्या लोकेशन अनुसार चालू किंवा बंदही होईल. याची किंमत – ३९,५९९ रु. आहे.

स्प्लिट एसी १.६ टी विथ स्मार्ट इन्व्हर्टर: हेका स्मार्ट तंत्राज्ञानाआधारित ३ स्टार १.६ टी स्मार्ट इन्व्हर्टर एसी आजूबाजूच्या तापमानानुसार अनेक कस्टमाइझ्ड मोड्समध्ये स्वतः परिवर्तीत होतो. खोलीतील तापमानासोबत अनुकूल होत, हा एसी ४०% पर्यंत ऊर्जा बचत करतो. त्याचे ईजीएपीए फिल्टर चांगल्या आरोग्यासाठी शुद्ध हवा प्रदान करते आणि एको-फ्रेंडली रिफ्रिजरेन्ट ओझोन थर कमी करते, पर्यावरणाचे संरक्षण करते. याचे आणखी एक विलक्षण वैशिष्ट्ये म्हणजे आपण एसीजवळ जाताच तो आपोआप कार्यान्वीत होतो. आवाज नियंत्रण प्रणालीद्वारे हा एसी स्वयंचलित होतो. याची किंमत ३५,९९९ रु. आहे.

झिंगर कॉपर हॉट: गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की चांगले पचन होण्यासाठी, सजलीकरण (हायड्रेशन), रक्ताभिसरण आणि मध्यवर्ती मज्जासंस्था कार्यरत ठेवण्यासाठी. तांब्याच्या अंगभूतगुणांसह लिव्हप्युअरच्या खास कॉपर कार्ट्रिज आणि ६ टप्प्यांच्या फिल्टरेशनसह हे सर्व फायदे मिळतात. झिंगर कॉपर हॉटसह, आपल्याला आरओ+यूएफ+यूव्ही शुद्धीकरण मिळते, तर यातील टँकचे यूव्हीमुळे निर्जंतुकीकरण होते आणि जवळपास २०,००० लिटर पाण्याची बचत होते. याची किंमत २१,७७० रु. आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.