
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
वैशाख कृष्ण नवमी / दशमी
वसंत ऋतू.
पराभव नाम संवत्सर.
शके १९४८, संवत २०८२
⏰ राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
✨ “आज उत्तम दिवस आहे”
🌙 चंद्रनक्षत्र – शततारका
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ. एइंद्र योगाची शांती करून घेणे.
🪐 ग्रहस्थिती :-
रवी लाभ गुरू
🪔 राशिभविष्य (Marathi Rashi Bhavishya)
♈ मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
तुमच्याच राशीतील उच्च सूर्याचा तृतीय गुरुशी शुभ योग आहे. आज आत्मविश्वास वाढेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. मोठा पराक्रम गाजवाल.
♉ वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. कुटुंबीयांसोबत आनंददायी वेळ जाईल. प्रवास टाळावा.
♊ मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. संयमाने निर्णय घ्या. आरोग्याची काळजी घ्या.
♋ कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
भाग्याची साथ लाभेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात मन रमू शकते. शुभ वार्ता मिळेल.
♌ सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
अनपेक्षित खर्च संभवतो. व्यवहारात सावधगिरी बाळगा. वादविवाद टाळा.
♍ कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
भागीदारीत लाभ होईल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. कामात प्रगती दिसून येईल.
♎ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
दिवसभर व्यस्तता राहील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आरोग्य सुधारेल.
♏ वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
मन प्रसन्न राहील. सर्जनशील कार्यात यश मिळेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल.
♐ धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
घरगुती वातावरण आनंदी राहील. मालमत्तेच्या कामात प्रगती होईल. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल.
♑ मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
प्रवासाचे योग संभवतात. संवादातून लाभ होईल. मित्रांकडून मदत मिळेल.
♒ कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन योजना लाभदायक ठरतील. आत्मविश्वास वाढेल.
♓ मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
आजचा दिवस अनुकूल आहे. मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. सामाजिक मान-सन्मान वाढेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)



