मनसेची ३२ उमेदवारांची यादी जाहीर :नाशिक मध्य मतदार संघातून अंकुश पवार यांना उमेदवारी 

नाशिक पूर्व मधून प्रसाद दत्तात्रय सानप,तर  देवळाली मतदार संघातून मोहिनी गोकुळ जाधव यांना संधी 

0

मुंबई,दि,२७ ऑक्टोबर २०२४ –महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी ३२ उमेदवारांची सहावी यादी (MNS Candidate List )आज जाहीर केली. आतापर्यंत मनसेचे ११७ उमेदवार जाहीर झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने ही यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत नाशिक मध्यमधून युवानेतृत्व तथा मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश अरुण पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे युवा वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आजच्या ३२ उमेदवारांच्या यादीत नाशिक पूर्व मधून प्रसाद दत्तात्रय सानप,तर  देवळाली मतदार संघातून मोहिनी गोकुळ जाधव यांना संधी देण्यात आली. या अगोदर नाशिक पश्चिम मध्ये दिनकर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे आता पर्यंत नाशिक जिल्ह्यात मनसेचे ४ उमेदवार  जाहीर झाले आहे.

अंकुश पवार यांची नाशिक मध्य मधून उमेदवारी जाहीर झाल्या मुळे सर्वांचे लक्ष लागून असलेल्या नाशिक मध्य मतदार संघात चौरंगी लढत होणार आहे. मनसे चे अंकुश पवार महाआघाडीच्या वसंत गीते, अपक्ष उमेदवार हेमलता पाटील ,भाजपाच्या देवयानी फरांदे यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होणार आहे. २९ ऑक्टोबर अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असून ३ नोव्हेंबर नंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

मनसेची उमेदवार सहावी उमेदवार यादी  
1. नंदुरबार – वासुदेव गांगुर्डे
2. मुक्ताईनगर- अनिल गंगतिरे
3.सावनेर- घनश्याम निखोडे
4.नागपूर पूर्व- अजय मारोडे
5.कामठी- गणेश मुदलियार
6.अर्जुनी मोरगाव-भावेश कुंभारे
7.अहेरी- संदीप कोरेत
8.राळेगाव- अशोक मेश्राम
9.भोकर- साईप्रसाद जटालवार
10.नांदेड उत्तर- सदाशिव आरसुळे
11.परभणी- श्रीनिवास लाहोटी
12.कल्याण पश्चिम- उल्हास भोईर
13.उल्हासनगर- भगवान भालेराव
14.आंबेगाव- सुनील इंदोरे
15.संगमनेर-योगेश सूर्यवंशी
16.राहुरी- ज्ञानेश्वर गाडे (माऊली)
17.नगर शहर- सचिन डफळ
18.माजलगाव-  श्रीराम बादाडे
19.दापोली- संतोष अबगुल
20.इचलकरंजी- रवी गोंदकर
21.भंडारा-अश्विनी लांडगे
22.अरमोरी- रामकृष्ण मडावी
23.कन्नड- लखन चव्हाण
24.अकोला पश्चिम- प्रशंसा अंबेरे
25.सिंदखेडा- रामकृष्ण पाटील
26.अकोट- कॅप्टन सुनील डोबाळे
27.विलेपार्ले- जुईली शेंडे
28.नाशिक पूर्व -प्रसाद सानप
29.देवळाली- मोहिनी जाधाव
30.नाशिक मध्य -अंकुश पवार
31. जळगाव ग्रामीण- मुकुंदा रोटे
32.आर्वी- विजय वाघमारे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.