Navratri festival 2024:आजचा रंग राखाडी :पहा काय महत्व आहे राखाडी रंगाचे

आजचा रंग - राखाडी आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा

0

आज शनिवार,नवरात्रीचा दिवस तिसरा  शनीला राखाडी-कृष्ण वर्णाचे वस्त्र जास्त पसंत असल्यामुळे आज राखाडी रंगाचे महत्व आहे. या राखाडी रंगाला जास्त पसंती देणाऱ्या व्यक्ती तटस्थ वृत्तीच्या असतात. त्यांना अलिप्त राहणे पसंत असते. आपले संरक्षण आपणच करू अशी त्यांना श्रध्दा असते. बऱ्याच वेळा स्वत:ची मते उघड न करण्याचा कल असतो. उद्योग व्यवसायात किंवा उच्च अधिकाराच्या जागेवर असणाऱ्या व्यक्तींमध्ये या गोष्टी आढळतात. योग्य ठिकाणी योग्य परंतु एकंदरीत मोजके बोलणे यांना प्रिय असते. व्यक्तिमत्वात शिस्त असते.

राहू आणि केतू हे नवग्रहांमधील दोन ग्रह आहेत त्यांचा आपल्या जीवनावर प्रभाव असतो. तो कमी करण्यासाठी आपल्याला राखाडी रंगाचे रत्न परिधान करावे लागते. स्थिरतेचा, सुरक्षतेचा, कौशल्याचा, शिस्तबद्ध्तेचा असा हा करडा रंग आहे. न्युट्रल रंग म्हणजे राखाडी. या रंगासोबत कोणताही रंग शोभून दिसतो.
साभार -दा. कृ. सोमण ,पंचांगकर्ते

Dhanashree Adhe (Singer)
धनश्री आढे (गायिका)

आजचा रंग – राखाडी
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.