आजचे राशिभविष्य सोमवार,२७ मे २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
वैशाख कृष्ण पंचमी. ग्रीष्म ऋतू. 
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – पू. षा./ उ. षा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु/(दुपारी ४.०५ नंतर) मकर. 
“आज उत्तम दिवस आहे.” 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:- अनुकूल ग्रहमान आहे. तीर्थयात्रा घडेल. हातून चांगले काम घडेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत सुखद अनुभव येतील.

वृषभ:- दिवसाचा पूर्वार्ध संथ आहे. दुपारनंतर कामाचा वेग वाढेल. स्वप्ने साकार होतील. मित्र मंडळी समवेत सहभोजन कराल.

मिथुन:- दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीची भेट होईल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. शत्रूपिडा जाणवेल.

कर्क:- उत्तम दिवस आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. अचानक लाभ होतील. येणी वसुली होतील.

सिंह:-  अनुकूल ग्रहमान आहे. काही नवीन संधी चालून येतील. पत्नीची उत्तम साथ लाभेल. योग्य सल्ला मिळेल.

कन्या:- चांगले ग्रहमान आहे. जुन्या वस्तू सापडतील. आरोग्य सुधारेल. दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय होतील.

तुळ:- दिवसाच्या पूर्वार्धात आर्थिक लाभ होतील. कनिष्ठ सहकारी मदत करतील. गुप्त शत्रू पराभूत होतील. महिलांना यश मिळेल.

वृश्चिक:- उत्तरार्ध अधिक अनुकूल असला तरी एकूणच आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. द्रव पदार्थ विक्रेत्यांना लाभ होतील. अर्थकारण सुधारेल.

धनु:- आयुष्याला नवा अर्थ प्राप्त होईल. नात्यातून लाभ होतील. योग्य गुरू मिळेल. सत्संग लाभेल. दानधर्म कराल.

मकर:- दिवसाचा पूर्वार्ध खर्चात टाकणारा आहे. वेळोवेळी आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. संध्याकाळ आनंदाची.

कुंभ:- सुरुवातीला उत्तम दिवस आहे. जुनी येणी वसूल होतील. आध्यात्मिक लाभ होतील. वास्तू साठी खर्च कराल.

मीन:- अत्युत्तम दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. इतरांचे सहकार्य मिळेल. अवघड वाटणारी कामे सोपी होतील. व्यवसाय वाढेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.