आजचे राशिभविष्य बुधवार,२४ जुलै २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
आषाढ कृष्ण तृतीया/चतुर्थी. 
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज क्षय तिथी आहे” *संकष्टी चतुर्थी*(चंद्र उदय मुंबई – ९.४८, नाशिक ९.४४) 
नक्षत्र – शततारका/पू.भा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल चंद्राचा गुरुशी केंद्र योग आहे. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. वारसा हक्काची कामे काहीशी  रेंगाळतील. आध्यात्मिक लाभ होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. दीर्घकालीन फायद्याच्या घटना घडतील. दानधर्म कराल. कुटुंब सुखात काहीशी कमतरता जाणवेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) तीर्थयात्रा घडेल. राज कृपेचा लाभ होईल. गुरू सानिध्य लाभेल. गुरुची नाराजी अधिक जाणवेल. खर्च वाढतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. गूढ बाबींचा उलगडा होईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील. मित्रमंडळी नाराज होऊ शकतात.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रगतीची घोडदौड चालू राहील. कोर्ट कामात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. नोकरीच्या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. षष्ठ स्थानी चंद्र आहे. अचानक लाभ होतील. कनिष्ठ वर्ग सहकार्य करेल. दानधर्म करावा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. कोर्ट कामात यश मिळेल. शत्रूचा नायनाट होईल. उच्च शिक्षणात यश मिळेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सामाजिक कामात लाभ मिळतील. अडचणी दूर होतील. घरगुती कामे मार्गी लागतील. पत्नीशी मतभिन्नता वाढू देऊ नका.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अर्थलाभ होईल.  लक्ष्मी प्रसन्न राहील. शौर्य दाखवाल. छोटे प्रवास घडतील. लाभ वाढतील. मौल्यवान वस्तू सांभाळा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक चिंता सतावतील  मनस्थिती बिघडेल  मतभेद संभवतात. मनस्थाप जाणवेल,प्रेमात नुकसान संभवते.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्याच राशीत चंद्र – शनी युती आहे. उत्तम लाभ होतील. मनाची शांतता आणि स्थिरता लाभेल. मनशक्तीचा अनुभव घ्याल. सामाजिक कार्यातून मात्र त्रास जाणवेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र ग्रहमान आहे. आध्यत्मिक उन्नतीस उत्तम कालावधी आहे. दानधर्म कराल. तीर्थयात्रा घडेल. महत्वाचा उपदेश प्राप्त होईल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.