एस सोमनाथ ISRO चे नवीन अध्यक्ष 

0

नवी दिल्ली – भारताची अंतराळ संस्था ‘भारतीय अंतराळ आणि संशोधन संघटना’ अर्थात ISRO चे पुढील प्रमुख म्हणून रॉकेट शास्त्रज्ञ एस सोमनाथ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.एस सोमनाथ ISRO मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख असेलेल्या सिवन यांची जागा घेतील. के सिवन यांचा कार्यकाळ शुक्रवारी संपत आहे.

भारतीय अंतराळ क्षेत्रात खाजगी कंपन्यांना व्यापाराच्या संधी विकसित करणं गरजेचं आहे. भावी पीढीच्या गरजा लक्षात घेऊन भारतीय अंतराळ कार्यक्रमात बदल करणं देखील गरजेचं आहे.असे ISRO चे नवनियुक्त अध्यक्ष एस सोमनाथ यांनी म्हटलं आहे

ते पुढे म्हणले कि भारतीय अंतराळ कार्यक्रम ISRO पर्यंतच मर्यादित आहे. मात्र आता सरकारची इच्छा आहे की, या क्षेत्रात नवीन लोकं यावीत.अंतराळ बजेट वाढवण्याची गरज आहे असे हि नवनियुक्त अध्यक्ष सोमनाथ यांनी सांगितले. सध्याचं अंतराळ बजेट १५,०००-१६,००० कोटी आहे. जे वाढवून आता  २०,०००-५०,००० कोटींहून अधिक करण्याची गरज आहे. सोमनाथ यांनी म्हटलं आहे की, अंतराळात प्रगती ही केवळ सरकारी निधि किंवा पाठिंब्यानंच होणरा नाही. दूरसंचार आणि हवाई यात्रा अशा क्षेत्रात जे बदल झाले ते या क्षेत्रातही होणं गरजेचं आहे.  यामुळं अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होती आणि संशोधनाच्या क्षेत्राची व्याप्ती अधिक होईल. असं असलं तरी इसरोचं खाजगीकरण मात्र होणार नाही, असं सोमनाथ यांनी स्पष्ट केलं.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.