मागील काही दिवसापासून जगभरातील आणि देशातील सुद्धा शेअर बाजार दिशादर्शकता असा सूचक मार्ग दिसत नसून एका रेंजमध्ये खेळताना दिसत आहे त्याला मुख्य कारण म्हणजे निफ्टी ही उच्चांक क्रॉस करण्यास प्रवृत्त करत आहे त्याच बरोबर तज्ञांच्या मते मान्सून फॅक्टर हा सुद्धा महत्त्वाचा मानला जात आहे आजच्या बाजारामध्ये सकाळी जागतिक संकेतांच्या आधारे बाजार सकारात्मक उघडला परंतु हळूहळू वरच्या स्तरावरून बाजारामध्ये नफा वसुली बघायला मिळाली.
त्याचबरोबर बाजार आज अस्थिर सुद्धा राहिला त्याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स तेरा अंकांनी घसरून 52372 या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी सुद्धा फक्त तीन अंकांनी वधारून 15693 या पातळीवर बंद झाला, त्याच बरोबर 12 बँकिंग समभाग मिळून तयार झालेला बँक निफ्टी हा निर्देशांक मात्र 127 अंकांनी वधारून 35199 या पातळीवर बंद झाला.
आज बाजारामध्ये दिवसभर कभी खुशी कभी गम असे सत्र बघायला मिळाले कारण बाजार एक तर्फे कोणतीही दिशा दर्शवत नव्हता परंतु दिवसभर असतील स्वरूपात आणि वरच्या स्तरावर बहुतेक क्षेत्रांच्या सर्व भागांमध्ये नफा वसुली होत होती, यामध्ये आयटी इंधन बनवणाऱ्या कंपन्या स्टील हे आघाडीवर होते.
बाजारातील जाणकार सांगत आहेत की बाजार यापुढे सुद्धा अशाच स्वरूपाचा दिसू शकतो परंतु बाजार तर खाली कोसळला तर ही संधी समजावी पण ही संधी समजून घेताना गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेऊनच करावी कारण सध्या बाजारामध्ये आंधळे घोडे सुद्धा धावताना दिसत आहेत त्यामुळे आपण यांना बळी पडू नये याची काळजी सुद्धा घेतली पाहिजे.
कमोडिटी बाजारामध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदी काही प्रमाणात स्वस्त मिळत होत्या तर कच्चा तेलामध्ये परत मागणी दिसली याचाच परिणाम महागाईवर होण्याचा शक्यता आहे.
देशामध्ये मान्सूनला काही प्रमाणात सुरुवात झालेली असली तरी काही भागांमध्ये अजून सुद्धा मान्सून होणे बाकी आहे हा फॅक्टर सुद्धा बाजारावर हावी होऊ शकतो जर पाऊस अजून काही दिवस लांबणीवर गेलात पण तज्ञ सांगत आहेत की लसीकरणाची मोहीम व तिसरी लाट आली नाही तर बाजारामध्ये चे क्षेत्र बंद अवस्थेत पडलेले आहेत त्या क्षेत्रांच्या समभागांमध्ये आपल्याला मागणी दिसून येऊ शकते.
विश्वनाथ बोदडे, नाशिक