विश्वनाथ बोदडे, नाशिक
,
यामध्ये स्टील मेटल बँकिंग स्मॉल कॅप मिडकॅप या क्षेत्रांच्या समभागांमध्ये चांगलीच विक्री बघायला मिळाली दुपारच्या सत्रात बाजार पाचशेपेक्षा जास्त अंकांनी घसरला होता परंतु शेवटच्या क्षेत्रात काही प्रमाणात खरेदी दिसली त्याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक SENSEX तब्बल 485 अंकांनी घसरून 52569 या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक NIFTY सुद्धा 152 अंकांनी वरून 15728 या पातळीवर बंद झाला त्याच बरोबर 12 बँकिंग संभाग म्हणून तयार झालेला बँक निफ्टी हा निर्देशांक 497 अंकांनी पसरून 35274 या पातळीवर बंद झाला.
रुपयाच्या मोबदल्यात आज डॉलर मजबूत दिसला तर मागील काही दिवसांपासून कच्चे तेल सातत्याने वाढत होते त्याला काही प्रमाणात लगाम लागला त्याच बरोबर कमोडिटी बाजारांमध्ये सोने आणि चांदी काही प्रमाणात चढ-उतार होतांना दिसत आहेत.
मोदी सरकारची खातेवाटप याचासुद्धा बाजारावर काही प्रमाणात परिणाम दिसला असला तरी बाजारामधून भांडवल बाहेर निघण्याचे कारण म्हणजे बाजारामध्ये नवीन आयपीओ सध्या सुरू आहेत यामध्ये प्रामुख्याने क्लीन सायन झोमॅटो हे आहेत.
बाजारातील जाणकार सांगत आहेत की बाजार खाली आला तरीही खरेदीची संधी समजून टप्प्याटप्प्याने विविध क्षेत्रांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करणे उचित ठरेल त्याच बरोबर बाजारामध्ये गुंतवणूकदारांमध्ये अशीही चर्चा दिसून येत आहेत की बाजार सध्या उंच स्थरावर असल्यामुळे काही प्रमाणात नफा वसुली होऊ शकते परंतु जर देशभरामध्ये तिसरी लाट आली नाही आणि लसीकरणाचे प्रोसेस योग्य पद्धतीने राबवली गेली तर त्याचा परिणाम उद्योगधंद्यावर सकारात्मक दिसून येऊ शकतो त्यामुळे जे उद्योग धंदे सध्या बंद अवस्थेत आहेत त्यांना काही प्रमाणात चालना मिळेल व त्यांच्या सर्व भागांमध्ये खरेदी बघायला मिळू शकते.