करडईच्या भाजीचे आरोग्यास ‘हे’आहेत फायदे 

डॉ.राहुल रमेश चौधरी

0

(डॉ.राहुल रमेश चौधरी)अनेक पालेभाज्या रोजच्या जेवणात खाण्यात असतात त्यापैकीच एक म्हणजे करडई.करडई खाताना कोवळी पानांचीच खावी.या करडई च्या तेलाचा देखील खाण्यात वापर केला जातो.रंगकामाकरीता या भाजीची पिवळी फुले वापरली जातात.अश्या या करडई भाजीची माहीती आपण आज बघूयात.

१.रक्त पडत नसलेल्या मुळव्याधीत करडई चे भाजी खाणे उपयोगी.
२.करडई च्या भाजीच्या पोटीस ने शेकल्यास मार,वेदना यात आराम मिळतो.
३.लघवीस चिकट ,बुळबुळीत होत असल्यास अथवा गढुळ रंगाची होत असल्यास करडई च्या पानांचा रस व धने चुर्ण सकाळी घ्यावे.
४.घशात चिकटा तयार होणे, लाळ सुटणे असे असल्यास करडई ची पाने चावून खावी व लाळ थुंकावी.
.लहान मुळे वगळता इतरांना जंताचा त्रास जाणवत असल्यास करडई ची भाजी करडई च्या तेलात परतून खावी.
६.भूक लागून पण जेवण न जाणे,अन्नाची चव न लागणे याकरीता करडई ची भाजी ,भाजलेले फुलके ज्वारीची अथवा भाजणीची भाकरी खावी .भाजीला लसणाची फोडणी द्यावी.
७.अंगावरील चरबीचे प्रमाण कमी करावयाचे असल्यास करडईच्या भाजीचा रस व करडई चे तेल एकत्र शिजवलेल्या मिश्रणाने मसाज करून आंघोळ करावी.

निषेध
१.करडई चे तेल डोळ्यात जावू नये याची काळजी घ्यावी,याबे डोळयांना आग होणे,दुखणे ,पाणी येणे या तक्रारी निर्माण होतात.
२.करडईची भाजी अतिशय़ पित्तकर असल्याने पित्ताचे रुग्ण,उष्णता असणारे ऋतु,पित्तप्रधान प्रकृतीचे रुग्णांत टाळावी.
३.करडई ची भाजी सतत खाल्ल्याने डोळ्यांचे आजार निर्माण होतात.
४.तसेच रक्त खराब होवून रक्ताचे विकार निर्माण होतात.
.करडई चे तेलात सर्व तेलात निकृष्ट याचा वापर करु नये.
.करडई ची भाजी पचायला जड असल्याने रात्री खावू नये.७.करडई ची भाजी खाल्ल्याने पोटात आग होण्याचा संभव असतो.त्यामुळे टाळावी.

(विशेष सूचना – वरील सर्व उपाय वैद्य सल्ल्याने करावे.)
यावर काहीही शंका असल्यास खालील मोबाईलनंबर वर संपर्क साधावा.
डॉ.राहुल रमेश चौधरी
एम्.डी.(आयु.),मुंबई
एम.ए.(संस्कृत),पुणेसहाय्यक प्राध्यापक ,
श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यलय व रुग्णालय,नाशिक
मोबाईल-९०९६११५९३०

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.