ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
कार्तिक कृष्ण, तृतीया, दक्षिणायन, शरद ऋतू, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज ९.०० पर्यंत चांगला दिवस आहे.”
चंद्र नक्षत्र: मृग,
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) प्रतिष्ठा पणाला लागेल. आर्थिक लाभ होतील मात्र वादविवाद टाळा. लेखन करताना काळजी घ्या.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कलाप्रांतात चमक दाखवाल. बोलण्यातून गैरसमज होऊ शकतात. विक्री व्यवसायात लाभ होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आत्मविश्वास वाढेल. तत्वाने वागणे हिताचे आहे. सरकारी कामातून मास्नीक त्रास जाणवेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मन अस्वस्थ राहील. अध्यात्मिक लाभ होतील. गुरुचे मार्गदर्शन मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आनंदी दिवस आहे. उत्साही वाटेल. नेतृत्वगुण कामास येतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्ययवसायत अधिक लक्ष द्यावे लागेल. ग्राहक नाराज होऊ शकते. अधिकारी व्यक्तीकडून त्रास होऊ शकतो.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू, ते) उच्च शिक्षणात यश मिळेल. पित्याकडून मोलाचा सल्ला किंवा मदत होईल. प्रवासात काळजी घ्या.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) रक्तदाबाचा त्रास जाणवेल. मन शांत ठेवा. नियमित आरोग्य तपासणी करा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा, भे) घरात जोडीदाराशी वाद टाळा. त्यांना समजून घ्या. स्वतंत्र व्यवसाय करण्यास अनुकूल कालावधी आहे.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक लाभ होतील. कर्जे मंजूर होतील. व्यवसायात वाढ होईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) बुद्धिमत्तेचा सुरेख वापर कराल. धाडसी निर्णय घ्याल. छोटे प्रवास संभवतात.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) गृहकलह टाळा. कुटुंबास वेळ द्या. सूर्याची उपासना करा.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)