बिग बॉस मराठीच्या घरामधून स्नेहा वाघ बाहेर !

0

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामधून नॉमिनेशन कार्यात या आठवड्यात घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेमध्ये उत्कर्ष, दादूस, मीरा, स्नेहा, गायत्री आणि सोनाली नॉमिनेट झाले. कालच्या भागामध्ये या सदस्यांमध्ये गायत्री, सोनाली सेफ झाली आणि उत्कर्ष, मीरा, स्नेहा आणि दादूस डेंजरमध्ये गेले. आज मीरा आणि स्नेहा डेंजर झोनमध्ये होते ज्यामध्ये स्नेहा वाघला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.

बिग बॉस मराठीचा हा आठवडा विशेष ठरला कारण घराला मिळाले होते टॉप १० सदस्य. आठवड्याच्या सुरूवातीपासूनच घरामध्ये राडे बघायला मिळाले… घरातील समीकरण बदलताना दिसली. मीनल आणि गायत्री, तर जय आणि विकास मध्ये राडा झाला. मीरा आणि उत्कर्ष होते गायत्रीवर नाराज तर, विकास आणि सोनालीमध्ये दखील झाले भांडण… दुसरीकडे कार्यामध्ये विघ्न आणाल्या कारणाने मीरा आणि विशालला भोगावी लागली कारागृहाची शिक्षा… गायत्री दातार बनली घराची कॅप्टन… हे सगळं घडत असतानाच घरामध्ये काही खास पाहुण्यांची एंट्री झाली.

घरामध्ये झालेल्या राड्यांवर महेश मांजरेकर यांनी सदस्यांची शाळा घेतली, कोण कुठे चुकते आहे हे सांगितले आणि सदस्यांची कानघडणी केली. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या फन्सची चुगली चुगली बूथद्वारे स्नेहा, Sonaliला, सांगितली. तर दादूस, विकास आणि विशाल यांनी बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली.

कसा असणार नवा आठवडा ? कोणते सदस्य होणार नॉमिनेट ? कोणकोणते नवे टास्क घरामध्ये रंगणार ? बिग बॉस मराठी सिझन ३ सोम ते रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.