ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
कार्तिक, शुक्ल, एकादशी, दक्षिणायन, शरद ऋतू.
राहू काळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
आज संध्याकाळी ६.०० पर्यंत चांगला दिवस आहे. प्रबोधिनी स्मार्त एकादशी विष्णू प्रबोधउत्सव.
चंद्र नक्षत्र – पूर्वा भद्रपदा (दुपारी ४.३१ पर्यंत) चंद्र सकाळी १०.११ नंतर मीन राशीत.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- अध्यात्मिक लाभ होतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मन आनंदी राहील.
वृषभ:- आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. दिवस आनंदात घालवाल.
मिथुन:- प्रसन्न कालावधी आहे. छोटी सहल कराल. आप्त भेटतील.
कर्क:- सौख्य लाभेल. चैन कराल. आनंदी राहाल.
सिंह:- नेतृत्व बहरेल. मान सन्मान मिळतील. गैरसमज मात्र टाळा.
कन्या:- प्रेमात यश मिळेल. जोडीदार आनंदी राहील. उत्तम दिवस आहे.
तुळ:- आर्थिक लाभ होतील. दिवस आनंदात घालवाल. शुभ समाचार समजतील.
वृश्चिक:- काही कामे पुढे ढकलली गेली तरी त्यातून लाभच होईल. कोडी सुटतील. सूचक घटना घडतील.
धनु:- फारसा अनुकूल दिवस नाही. नेहमीची कामे चालू ठेवा.
मकर:- आर्थिक आवक चांगली होईल मात्र खर्चात देखील वाढ होऊ शकते.
कुंभ:- हुरहूर वाटेल. अनामिक भीती दाटून येईल. आर्थिक लाभ होतील.
मीन:- आत्मविश्वास वाढेल. काही महत्वाची मंडळी भेटतील. कामे मार्गी लागतील.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)