अभिनेते प्रकाश राज यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी पुन्हा एकदा केले लग्न : फोटो झाले व्हायरल 

0

मुंबई : आपल्या दमदार अभिनयाने मोठया पडद्यावर व्हिलनची भूमिका साकारणारे अभिनेते प्रकाश राज सर्व रसिकांना सुपरिचिता आहेच. अनेकजण त्याच्या अभिनयाचे दिवाने आहेत. त्यांच्या अभिनया बरोबरच ते आपल्या विविध वक्तव्यावरून सुद्धा नेहमीच चर्चेत असतात. वाँटेड, सिंघम या बॉलिवूड चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तर त्यांना विशेष मान आहे. दरम्यान मोठ्या पडद्यावर अनेकदा व्हिलन साकारणारे प्रकाश राज त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूपच रोमँटिक आहेत. त्यांनी त्यांच्या लग्नाची ११ वर्ष अत्यंत खास पद्धतीने साजरी केली.५६ वर्षाचे अभिनेते प्रकाश राज यांनी त्यांची पत्नी पोनी वर्मा यांच्याशी पुन्हा एकदा लग्न केलं.

आपल्या मुलासाठी या दाम्पत्याने पुन्हा एकदा लग्न केलं असून सोशल मीडियावर त्यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.प्रकाश राज यांनी ट्विटरवर काही फोटो शेअर करत म्हटलं आहे की, आम्ही आज पुन्हा एकदा लग्न केलं कारण आमचा मुलगा वेदांतला आमच्या लग्नाचा साक्षीदार व्हायचं होतं.

प्रकाश राज यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. त्यांनी यामध्ये त्यांच्या लग्नाचे थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘It clothed so right.. for strangers within the night.. खूप कमाल मैत्रिण बनण्यासाठी, प्रेमिका आणि आयुष्यात सहप्रवासी बनण्यासाठी… माझ्या लाडक्या बायकोचे धन्यवाद..

प्रकाश राज आणि पोनी यांनी २०१० मध्ये विवाह केला होता. त्यांची पहिली भेट देखील एका चित्रपटाच्या सेटवरच झाली होती, ज्यावेळी पोनी एक गाण्याचं नृत्यदिग्दर्शन करत होत्या. प्रकाश राज यांचा हा दुसरा विवाह आहे, ते पहिली पत्नी लतिका कुमारी यांच्यापासून २००९ मध्ये विभक्त झाले होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.