उत्कर्ष करतो आहे विशालला भडकवण्याचा प्रयत्न ?
मासळी बाजारात अमूल्य मोतींवरून सदस्यांमध्ये भांडण...;विकास आणि गायत्रीमध्ये होणार वादावादी ?
मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोण कोणाच्या विरोधात कधी जाईल ? किंवा कोणाला कधी पाठिंबा देईल सांगता येत नाही… दिवसागणिक बदलत जाणारा सदस्यांचा खेळ आणि नाती, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांचे बदलते आणि खरं स्वरूप प्रेक्षकांना बघायला मिळते आह आता पुढे जाऊन सदस्यांमधील नात्यांचं कुठलं रूप आपल्याला दिसणार हे बघूया…
उत्कर्ष, जय आणि विशाल यांच्यात एक चर्चा आज रंगणार आहे.. उत्कर्ष विशालला सांगताना दिसणारं आहे, तू एकतर माझ्याकडे येणार किंवा जयकडे जाणार… जय तुझ्याकडे येणार किंवा मी तुझ्याकडे येणार, तीनच गोष्टी आहेत. विकास या गोष्टीत डायरेक्ट येत नाही… सपोर्टिव तुला आणतो आणि मग स्वत: मागून येतो पण होतंय काय इथेचं (आपल्या तिघांमध्ये) फिरत चालेल आहे सगळं. माझं म्हणणं आकाय आहे समजा तू नाही आलास यांनी यायला पाहिजे ना ? समजं मी पण नाही गेलो तर यांनी खेळल पाहिजे ना ?समजं जय नाही आला तर नाही खेळत कोणी… विषय काय होतो तिघांनीच या आणि तिघांनीच भिडा. तेच होत चाललं आहे.
मासळी बाजारात अमूल्य मोतींवरून सदस्यांमध्ये भांडण…;विकास आणि गायत्रीमध्ये होणार वादावादी ?
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू आहे “म्हावर्याला लागलाय नाद” हे साप्ताहिक कार्य सुरु आहे. आणि याच कार्याच्या शेवटी मिळणार आहेत कॅप्टन्सीचे दोन उमेदवार. उमेदवारी मिळविण्यासाठी सदस्य आतापासूनच जोरदार प्रयत्नात आहेत असे म्हणायला हरकत नाही. आज खेळात एक ट्विस्ट येणार आहे आणि आज बिग बॉस तो सगळ्या सदस्यांना सांगणार आहेत. आणि त्यावरूनच गायत्री आणि विकासमध्ये वादावादी होण्याची शक्यता आहे.
बिग बॉस यांनी जाहीर केले, समुद्रातून मासे पकडताना जाळ्यात मोतीही सापडले आहेत. या एका अमूल्य मोतीची किंमत आहे ५० मास्यांएवढी…टास्क दरम्यान विकास आणि गायत्रीमध्ये यावरूनच वाद होताना बघायला मिळणार आहे. गायत्रीचे म्हणणे आहे, विकास पाटील तुम्ही वरतून घेतला आहे… मी तो मोती धरणार नाही मोजताना.
“हा माझा गेम आहे त्याचा नाही…” – विकास
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना एकमेकांचे वागणे खटकु शकते… आणि त्या संदर्भात ते इतर सदस्यांची चर्चा करताना देखील दिसून येतात. आज एकीकडे विशाल जय आणि उत्कर्षशी खेळाविषयि चर्चा करताना दिसणार आहे तर दुसरीकडे विकास मीनलसोबत विशालबद्दल बोलताना दिसणार आहे. नक्की काय विकासच्या मनात… त्याला विशालची कोणती गोष्ट आवडत नाहीये.
विकास मीनलशी बोलताना दिसणार आहे, तरी मला आता जे दिसते आहे, तो गेल्या काही दिवसांपासून त्या गोष्टी करतो आहे. तिकडे जाऊन बोलतो आहे. त्याला असं कुठेतरी वाटतं आहे की हे आपण केले पाहिजे… दिसलं पाहिजे. सर पण जे बोले की विकेंडला माझ्याविषयी की जाऊन बोलतो… हे आपण करू शकतो. पण मी तेच म्हणतो आहे की हा त्याचा गेम नाहीये…. हा माझा गेम आहे. म्हणजे बोलणं म्हणा किंवा काही ते पण आता मी कमी केले आहे. त्यातून काही चांगलं निष्पन्न होत असेल तर काही चुकीचे नाहीये…
बघूया अजून काय काय घडले आज बिग बॉस मराठीच्या घरात. बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.