ज्ञानाच्या कुंभमेळ्यात होणार कॉपीराईट,पेटंट वर प्रबोधन  

वुई गो लायब्ररी फाउंडेशन साहित्य संमेलनातील स्टॉलवर मिळणार माहिती

0

नाशिक (प्रतिनिधी) – नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वैज्ञानिक/साहित्यिक डॉ जयंत नारळीकर असल्याने, हे साहित्य संमेलनाला वैज्ञानिक साहित्य संमेलन असल्याच्या चर्चा सध्या रंगात आहे. ज्ञानाच्या या कुंभमेळ्यात साहित्यिक, लेखक, प्रकाशक, विचारवंत यांचं आगमन होणार असल्याने या ठिकाणी आपले विचार आणि ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी सर्वानाच मोठी संधी मिळणार आहे.

या सर्व बाबी लक्षात घेत, साहित्यिक,लेखक, संशोधक यांना स्वतःच  ज्ञान जातन करताना कुठल्याही प्रकारे समस्या येऊ नये, कोणीही व्यक्ती ते कॉपी करू नये, त्यांचे साहित्य, विचार अथवा संशोधन यांच्यावरील कायदेशीर अधिकार हे कॉपीराईट,पेटंट किंवा आयपीआर द्वारे संरक्षित केले जावेत या हेतूने आम्ही वुई गो लायब्ररी फाउंडेशन साहित्य संमेलनात आमचा स्टॉल असणार आहे.या स्टॉलचे उदघाटन संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या हस्ते होणार आहे. लेखकांना त्यांचे लेखन कॅपीराइट करावे, संशोधनास चालना मिळावी यासाठी प्रबोधन करणारा हा स्टॉल असणार आहे.

पेटंट, कॉपीराईट जास्तीत जास्त झाल्यास देशचा जीडीपी वाढण्यास मदत होईल आणि संशीधन हे प्रगतीस हातभार लावेल, अधिकाधिक पेटंट भारताला मिळावेत . या कार्यासाठी आपले योगदान देण्याचा यातून आमचा प्रयत्न आहे.वुई गो लायब्ररी फाउंडेशन तर्फे सांगण्यात आले.

वुई गो लायब्ररी फाऊंडेशन बद्दल

वाचा. संशोधन करा. बुद्धी वाढवा.
• संशोधनासाठी वातावरण तयार करणे
• संशोधकासाठी इकोसिस्टम, आयडिया टू लॅब
• वाचन संस्कृती जोपासणे
• अनुदान आणि पेटंट कायदेशीर समर्थन
• विषय ग्रंथपाल आणि भारतीय संशोधनासाठी जागतिक मान्यता..

थोडक्यात:

वुई गो लायब्ररी १० लाख चौरस फुटांमध्ये पसरलेली असेल, ज्यामध्ये जगातील ७ खंडांमधील ६४ दशलक्ष पुस्तकांचा संग्रह असेल. वुई गो लायब्ररी ज्ञानाचा पाठपुरावा करण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणेल. नाशिक, भारत येथे स्थित, हे उत्सुक वाचक, संशोधक आणि इतिहास प्रेमींसाठी बौद्धिक मूल्याचे ठिकाण आहे. प्राचीन इतिहासाच्या पुस्तकांपासून ते अजिंठा येथील पुनर्संचयित भारतीय कला ते वेस्टर्न युरोपीयन कला, थिएटर ते मौल्यवान संग्रह, यात मानवी आत्म्याला उत्तम प्रकारे भुरळ घालणाऱ्या आणि मानवतेची सेवा करणाऱ्या मौल्यवान कामांचा व्यापक अष्टपैलू संग्रह आहे!

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.