महाराष्ट्रातील बहुतांश विभागात दाट धुके पडण्याची शक्यता ?
नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक भागात २८ तारखे नंतर पावसाची शक्यता ?
नाशिक – महाराष्ट्राच्या मध्य भागावर जमिनीपासून १५०० मिटर उंचीवर वाऱ्याची उलटी चक्राकार स्थिती असल्याने समुद्रावरील पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प मुबलक प्रमाणात महाराष्ट्रातील जमिनीवरती येत आहे.त्यामुळे पुढील २-३ दिवस तरी कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांत दाट धुके पडण्याची शक्यता आहे.अशी माहिती हवामान साक्षरता लोकचळवळीचे मुख्य प्रबंधक राहुल रमेश पाटील यांनी जनस्थानशी बोलतांना दिली.
हवामान विभागाने या आधीच महाराष्टातील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवली असून २८ तारखे नंतर नाशिक जिल्ह्यातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असे पाटील यांनी सांगितले आहे.
सामान्यतः हिमालयाकडून येणारे थंड वारे व काही प्रमाणात अरबी समुद्रावरून येणारी पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प याचा एकत्रित परिणाम होऊन दाट धुके पडण्याची शक्यता आहे.या दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळित होण्याची शक्यता आहे.अश्या वातावरणात विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते त्यामुळे सर्वानी काळजी घ्यावी असे ही राहुल पाटील यांनी सांगितले आहे.